शोरूमचे छप्पर तोडून चोरी

By Admin | Updated: July 21, 2016 02:28 IST2016-07-21T02:28:48+5:302016-07-21T02:28:48+5:30

कांदिवलीमध्ये शोरूमचे छप्पर तोडून चोरी करण्याचा प्रकार उघड झाला.

The rooftops of the showroom and theft | शोरूमचे छप्पर तोडून चोरी

शोरूमचे छप्पर तोडून चोरी


मुंबई : कांदिवलीमध्ये शोरूमचे छप्पर तोडून चोरी करण्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी अनोळखी व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अधिक तपास सुरू केला आहे.
कांदिवली पश्चिम परिसरात असलेल्या असल्फा इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये हा प्रकार घडला. दोन चोरांनी या दुकानाच्या छतामध्ये भगदाड पाडून आत शिरकाव केला. दुकानातील टीव्ही, फ्रीज, एसी, एलसीडी, होमथिएटरसारखे सामान चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, छतामधून हे सामान बाहेर नेणे अशक्य होते. त्यामुळे अखेर त्या चोरांनी दुकानातील महागडे मोबाइल आणि अन्य लहान इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेऊन पळ काढला. चोरांचा हा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दुकानाचे मालक सलीम शेख यांनी सांगितले आणि त्यांनी कांदिवली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The rooftops of the showroom and theft