मेसी श्रेष्ठ की रोनाल्डो, वादात मित्राकडून मित्राची हत्या

By Admin | Updated: March 7, 2016 16:21 IST2016-03-07T15:40:49+5:302016-03-07T16:21:13+5:30

मुंबईतल्या नालासोपा-यामध्ये मेसी श्रेष्ठ की, रोनाल्डो यावरुन झालेल्या वादामध्ये एका मित्राने दुस-या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Ronaldo of Messi the Best, a friend of the friend was killed by a friend | मेसी श्रेष्ठ की रोनाल्डो, वादात मित्राकडून मित्राची हत्या

मेसी श्रेष्ठ की रोनाल्डो, वादात मित्राकडून मित्राची हत्या

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७  - लिओनेल मेसी श्रेष्ठ की, ख्रिस्तियानो रोनाल्डो यावरुन जगभरातल्या फुटबॉलप्रेमींमध्ये नेहमीच वादविवाद होत असतात. पण रविवारी मुंबईतल्या नालासोपा-यामध्ये दोघांमध्ये श्रेष्ठ कोण ठरवण्यावरुन झालेल्या वादामध्ये एका मित्राने दुस-या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 
नालासोपा-यातील महेश वेल्फेअर सोसायटीच्या दुस-या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. या फ्लॅटमध्ये फरुमु ओबीन मायकल (३२) आणि चुकुम्वा मायकल नेवबू हे दोन नायजेरीयन मित्र भाडयाने रहात होते. रविवारी ओबीन चुकुम्वासोबत त्याचा वाढदिवस साजरा करत होता. 
यावेळी दोघांमध्ये मेसी श्रेष्ठ की रोनाल्डो यावरुन चर्चा सुरु झाली. थोडयाच वेळात या चर्चेचे रुपांतर हिंसक भांडणात झाले. चिडलेल्या फरुमु ओबीनने चुकुम्वावर ग्लास फेकून मारला. चुकुम्वाने त्याचा नेम चुकवला आणि ते ग्लास भिंतीवर आपटून फुटले. चुकुम्वाने जमिनीवर पडलेल्या फुटलेल्या ग्लासाचा तुकडा उचलला आणि त्याने ओबीनचा गळा चिरला. यात ओबीनचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण कबड्डी यांनी दिली. 
फ्लॅटमधून मोठमोठयाने भांडणाचे आवाज येत असल्याने शेजा-यांनी पोलिसांना  घटनास्थळी बोलवून घेतले. या इमारतीत अनेक नायजेरीयन नागरीक रहातात. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली चुकुम्वाला अटक केली. 

Web Title: Ronaldo of Messi the Best, a friend of the friend was killed by a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.