आर्ची-परश्याचा अभिनय पाहून रोमीओ-ज्युलीयट आठवले - इरफान खान
By Admin | Updated: May 24, 2016 17:47 IST2016-05-24T17:47:14+5:302016-05-24T17:47:14+5:30
परफेक्शनिस्ट अमीर खानने सैराट चित्रपट पाहून आपण निःशब्द झालो अशी भावना व्यक्त केली होती. या यादीत आता इरफान खान याचं नाव जोडलं गेलं आहे.

आर्ची-परश्याचा अभिनय पाहून रोमीओ-ज्युलीयट आठवले - इरफान खान
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ : प्रेषकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने बॉलिवूडच्या अभिनेत्यांनाही वेड लावल्याचं चित्र दिसते आहे. याआधी परफेक्शनिस्ट अमीर खानने सैराट चित्रपट पाहून आपण निःशब्द झालो अशी भावना व्यक्त केली होती. या यादीत आता इरफान खान याचं नाव जोडलं गेलं आहे. नुकताच सैराट पाहिला. चित्रपटातील आर्ची-परश्याचा अभिनय पाहून रोमीओ-ज्युलीयट आठवले असं म्हणत. त्यांने रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना त्यांच्या अभिनयाची पोचपावतीच दिली असं म्हणावे लागेल. आर्ची-परश्याच्या अभिनयावर सर्व बॉलिवूडकरांना झिंगायला लावलं आहे. तसेच त्याने चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, यांच्यासह सहाय्यक भूमिकेत असलेल्या तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख यांचेही कौतुक केलं आहे.
पाश्चिमात्य सिनेमाकडे वळणाऱ्या तरुण पिढीने असे सिनेमाही पाहायला हवेत. ही भारतीय चित्रपटाची नवी सुरुवात असून प्रादेशिक सिनेमा जागतिक स्तरावर जात असल्याचं लक्षण आहे.’ अशी प्रतिक्रिया इरफान खानने व्यक्त केली आहे. सैराटचा भारतीय चित्रपट श्रृष्टीवर नक्कीच पॉझिटिव परिणाम होईल. सैराट पाहून इरफान इतका भारवला आहे कि त्याने काही खास मित्रासाठी सैराट चित्रपटाचे स्पेशेल स्क्रिनिंग ठेवणार असल्याचे त्याने सांगीतले आहे. प्रदेशिक चित्रपटांना जगात महत्वाचे स्तान मिळत असताना सैराटने यावर्षी अनेक विक्रम मागे टाकत आपले नवे विक्रम स्थापन तयार केले आहेत असेही तो म्हणाला.
उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवून नवे रेकॉर्ड तयार केले आहे. आजही काही भागात सैराटचे शो हाऊसफुल आहेत. सैराट सिनेमाने दुबईवारी देखिल केली आहे. तर काही जणांनी सैराट सिनेमाला इतर भाषेत दाखवण्यात यावे अशी मागणी केली.