निवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय

By Admin | Updated: December 13, 2014 02:13 IST2014-12-13T02:13:46+5:302014-12-13T02:13:46+5:30

राज्यात अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत प्रसिद्धी माध्यमांची भूमिका प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.

The role of the media in the elections is laudable | निवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय

निवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय

सी़ विद्यासागर राव : ‘लोकमत’चे गजानन जानभोर यांना मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार
नागपूर : राज्यात अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत प्रसिद्धी माध्यमांची भूमिका प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले. 
नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि मारपकवार परिवारातर्फे दिल्या जाणा:या दलितमित्र, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचा वितरण समारंभ शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पत्रकारितेच्या क्षेत्रत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे सहायक संपादक गजानन जानभोर यांना राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी वरिष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे आणि नितीन तोटेवार यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांना जीवनगौरव पुरस्काराने या वेळी गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)
 
पुरस्काराची रक्कम प्लॅटफॉर्म शाळेला 
गजानन जानभोर यांनी पुरस्कार स्वरूपात मिळालेली 25 हजार रुपयांची रक्कम नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळेला देणगी स्वरूपात दिली. घरून पळून गेलेल्या, वाममार्गाला लागलेल्या रेल्वे स्थानकांवरील अनाथ मुलांचे संगोपन करण्याचे काम ही शाळा करते. 

 

Web Title: The role of the media in the elections is laudable