उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता आमदार रोहित पवार यांनी विम्याच्या रकमेवरून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुख्य पायलटचा पगार, त्याची गेलेली नोकरी आणि विमानाची किंमत व त्याचा काढलेला विमा यावरून रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
आज पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीला वाचविले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच पायलटचा वापर करून त्याला ब्लॅकमेल करून विमान अपघात घडविण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,अकाऊंटेबल मॅनेजरचं नाव साईटवरून डीलिट केलं. त्याचा इंटरव्ह्यू डीजीसीने घेतला. ही माणसं कुठे आहे. त्यांची चौकशी केली का. डीजीसीएने काल जी नोटीस दिली त्यात सीसी अकाऊंटेबल मॅनेजर लिहिले. पण तो कुठे आहे. जेट चालवत असाल तर लेगसीचं विमान चालवता येत नाही. पण पायलट कपूर हे दोन्ही विमान चालवत होते. नियमानुसार ते चुकीचे आहे. डीजीसीला सांगायचं की कागद रंगवू नका. कागदाचा फरक दिसला तर योग्य ठरणार नाही.
या अपघातामागे विम्याचे कारण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. VSR च्या विमानाची किंमत ३५ कोटी आहे. पण त्याची क्वॉलिटी पाहिली तर ते फक्त १० ते १५ कोटीला विकले जाऊ शकले असते. १० कोटींच्यावर हे विमान गेले नसते असे काही लोकांनी सांगितले. या १० कोटींच्या विमानाचा विमा ५५ कोटी रुपयांचा होता. विमानाची लाएबिलिटी होती २१० कोटी. त्यात पायलटही आले. पाचही जण आले. मेन पायलटला किती रुपये मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ही गोष्ट पायलटला माहीत होती का याचे स्पष्टीकरण मिळायला हवे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. गुंतवणूकदारांचे हित...काही लोक यात राजकारण आणि मैत्री आणत आहेत. यात मोठे इन्व्हेस्टर आहेत. त्यात मी जाणार नाही. शेकडो कोटींची गुंतवणूक आहे. त्यामुळे कंपनीला वाचवले जात आहे. १०० ते २०० कोटीसाठी कंपनीला वाचवू नका, अशी माझी इन्व्हेस्टरांना विनंती आहे. नाही तर आम्ही शांत बसणार नाही. आमचा काका त्यात गेला आहे. सुमित कपूर यांना दारू प्यायची सवय होती. जेटमध्ये त्यांचा पगार १० ते १२ लाख होता. पाच वर्ष ते बिना पगाराचे होते. त्यानंतर लेअर जेटमध्ये त्यांना संधी दिली. लेअर जेटमध्ये आल्यावर त्यांना ३ लाख रुपये पगार आला. प्रत्येक फेरीचे २५ हजाराच्या आसपास पैसे मिळत होते. त्यामुळे हा पगार ६ लाखावर गेला होता. व्यक्तिगत एका विषयामुळे ते डिप्रेशनमध्ये होते. त्याचा गैरफायदा घेऊन त्यांना ब्लॅकमेल केले का? याची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी रोहित पवार यांनी केली.
Web Summary : Rohit Pawar alleges a conspiracy in Ajit Pawar's plane crash, questioning the high insurance value (₹55 crore) against the plane's worth (₹10-15 crore). He suspects pilot blackmail and calls for investigation into VSR company's financial dealings and pilot's circumstances.
Web Summary : रोहित पवार ने अजित पवार के विमान दुर्घटना में साजिश का आरोप लगाया, विमान के मूल्य (₹10-15 करोड़) के मुकाबले उच्च बीमा मूल्य (₹55 करोड़) पर सवाल उठाया। उन्होंने पायलट को ब्लैकमेल करने का संदेह जताया और वीएसआर कंपनी के वित्तीय लेन-देन और पायलट की परिस्थितियों की जांच की मांग की।