शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:56 IST

Rohit Arya Encounter : मुंबई पोलिसांनी काल जाणीवपूर्वक रोहित आर्या याच्या छातीत गोळी मारली, असा आरोप आता सुरू झाला आहे.

Rohit Arya Encounter : काल मुंबईतील पवईच्या स्टुडिओमध्ये  १७ मुलांना ओलीस ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेत ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला, यामध्ये आर्या याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता आरोप सुरू झाले आहेत. वकील नितीन सातपुते यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'रोहित आर्या याचा मुंबई पोलिसांनी केलेला एन्काऊंटर बनावट होता. पोलिसांना रोहित आर्या याच्या हातावर किंवा पायावर गोळी मारणे शक्य होते. पण, डीसीपी अमोल वाघमारे यांना हिरो व्हायचे होते, त्यामुळे त्यांनी रोहित आर्या याच्या छातीत गोळी मारुन त्याला ठार केले',असा गंभीर आरोप वकील सातपुते यांनी केला. 

शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...

काल मुंबई पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटवर वकील नितीन सातपुते यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते त्यावेळी पोलिस अधिकारी दत्ता नलावडे रोहित आर्या याच्या संपर्कात होते. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांसोबत संवाद का साधला नाही? आर्या याला माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत संवाद साधायचा होता, तर पोलिसांनी का संवाद करुन दिला नाही? पोलिसांनी एन्काऊंटर सारखे टोकाचे पाऊलं का उचलले?, असा सवाल वकील वकील नितीन सातपुते यांनी केला. 

"रोहित आर्या याने मुलांना ओलीस ठेवण्याचे पाऊल उचलले पण ही परिस्थिती सरकारमुळेच आली. हा प्रसंग टाळता आला असता. आर्या याने त्याने केलेल्या कामाचे पैसे मिळावेत म्हणून उपोषण केले. पण सरकारने तरीही पैसे दिले नाहीत. रोहित आर्या हा दहशतवादी नव्हता. मग त्याचा ए्काऊंटर का केला?, असे प्रश्न सातपुते यांनी केले. 

वकीलांनी संशय व्यक्त केला

मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याच्याकडे पिस्तूल होती की नाही. याची माहिती पोलिसांनी अजून दिलेली नाही. पोलिस अधिकारी नलावडे यांनी आर्या याच्याकडे पिस्तूल होती की नाही याचा तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. मुलांना वाचवताना पोलिसांना त्याच्या पायावर गोळी मारता आली असती. अशा पद्धतीची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण दिलेले असते. मग त्यांनी पायावर गोळी का मारली नाही? या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वकील सातपुते यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Lawyer alleges fake encounter; police shot Arya for heroism.

Web Summary : Advocate Satpute alleges Rohit Arya's encounter was staged. He questions why police didn't shoot Arya in the leg, claiming DCP Waghmare wanted to be a hero. Satpute also raises concerns about lack of family contact during the rescue and demands an inquiry.
टॅग्स :advocateवकिलMumbaiमुंबईMumbai policeमुंबई पोलीस