रोहिडेश्वर किल्ला हिरवाईच्या शालूने नटला
By Admin | Updated: August 1, 2016 01:55 IST2016-08-01T01:55:19+5:302016-08-01T01:55:19+5:30
भोर तालुक्याच्या दक्षिणेस बारा किलोमीटर अंतरावर असणारा दुर्गम डोंगरी रोहिडेश्वर किल्ला परिसर पर्यटकांना भुरळ घालीत आहे़

रोहिडेश्वर किल्ला हिरवाईच्या शालूने नटला
संतोष म्हस्के,
नेरे- भोर तालुक्याच्या दक्षिणेस बारा किलोमीटर अंतरावर असणारा दुर्गम डोंगरी रोहिडेश्वर किल्ला परिसर पर्यटकांना भुरळ घालीत आहे़ रोहिडेश्वर किल्ल्यावरून पर्यटकांना भाटघर धरण, नीरा देवघर धरण, रायरेश्वर किल्ला यांच्याजवळून निसर्गरम्य व हिरवाईचा शालू पांघरलेल्याचे सौंदर्य पाहावयास मिळत आहे. यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे़
भोरचा दक्षिण भाग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा प्रदेश असल्याने पावसाळा चालू होताच या परिसरात लहान-मोठे धबधबे सुरू होतात़ या धबधब्यात ओलेचिंब होऊन पर्यटक आनंद लुटत आहेत़ बाजारवाडी गावाला ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी रोहिडेश्वर किल्ल्यास विचित्रगड नाव होते व ते तालुक्याचे ठिकाण होते़ या ठिकाणी बाजारपेठ होती व भव्य बाजार भरत असल्यामुळे या गावाला बाजारवाडी नाव पडले आहे़ गडावर शिवदुर्ग संवर्धन संस्था व बाजारवाडी ग्रामस्थांच्या माधमातून विकासकामे चालू आहेत़ गडावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने पायी मार्गाने जावे लागते़ विशेषत: या गडावर पर्यटक गिर्यारोहणासाठी-ट्रेकिंग आवर्जून येत आहेत़
गडावर रोहिडमल्ल देवस्थान असून, अंधारतळे पातळनगरीतळे
अशी २३ तळी आहेत. भोर-मांढरदेवी रस्तालगतच रोहिडेश्वर किल्ला असल्याने पर्यटक किल्ल्यावरून पर्यटन करून जवळीलच मांढरदेवी-काळूबाई गडाकडे रवाना होत
असतात़
या वेळी वाटेवरच सात किलोमीटरचा आंबाडखिंड
वळणा-वळणांचा घाट असून, या घाटात खळखळणारे धबधबे पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी
मोहित करतात.
>रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी गाव असून, या ठिकाणी पर्यटकांच्या गाड्यांसाठी पार्किंग व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे़ हिरव्यागार वेलींनी फुललेल्या डोंगररांगांवरून गडावर मनमोहक दृश्य पाहण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी राज्यातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे़