मुलीच्या आईवडिलांकडून ‘रोडरोमिओ’चा खून
By Admin | Updated: October 23, 2014 03:16 IST2014-10-23T03:16:18+5:302014-10-23T03:16:18+5:30
अल्पवयीन मुलीला त्रास व धमक्या देणाऱ्या तरुणाचा मुलीच्या आई-वडिलांनी खून केल्याची धक्कादायक घटना येथे घडली.

मुलीच्या आईवडिलांकडून ‘रोडरोमिओ’चा खून
भुसावळ (जि. जळगाव) : अल्पवयीन मुलीला त्रास व धमक्या देणाऱ्या तरुणाचा मुलीच्या आई-वडिलांनी खून केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे.
पंकज मनोहर अडकमोल (२२) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.आरोपी चंदनसिंग गोकुळ राजपूत व त्यांची पत्नी शकुंतला चंदनसिंग राजपूत यांनी राजू शिवाजी वानखेडे (पंचशील नगर) यांच्या मदतीने मंगळवारी रात्री पंकजच्या पोटावर चाकूने वार केले होते. पंकजला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पंकजवर हल्ला करण्यात आला. (प्रतिनिधी)