रोबोटिक्स टेक्नॉलॉजी नवे अवकाश

By Admin | Updated: February 15, 2016 04:07 IST2016-02-15T04:07:57+5:302016-02-15T04:07:57+5:30

आॅटोमोबाइल्सप्रमाणे मोबाइल, टॅबलेट, संगणक आणि अन्य गॅजेटच्या जोडणीत छोट्या सामग्रींची जोडणी किचकट आणि अवघड मानली जाते

Robotics Technology New Holidays | रोबोटिक्स टेक्नॉलॉजी नवे अवकाश

रोबोटिक्स टेक्नॉलॉजी नवे अवकाश

मुंबई : आॅटोमोबाइल्सप्रमाणे मोबाइल, टॅबलेट, संगणक आणि अन्य गॅजेटच्या जोडणीत छोट्या सामग्रींची जोडणी किचकट आणि अवघड मानली जाते. मात्र, देशात विकसित होत असलेल्या रोबोटिक्स् टेक्नॉलॉजीमुळे हे काम काही सेंकदांत पूर्ण होणे शक्य होणार आहे. मेक इन इंडिया सेंटरमधील दोन यूमी रोबो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
स्वित्झर्लंडच्या एबीबी कंपनीची भारतीय कंपनी असलेल्या एबीबी इंडियाने रोबोटिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे. देशात मोबाइल वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे फॉक्सकॉन, ह्युवेई, सॅमसंग यांसारख्या बड्या मोबाइल उत्पादकांबरोबरच मायक्रोमॅक्स, इंटेक्स या कंपन्यांकडून उत्पादन वाढीवर भर दिला जाणार आहे. मनगटी घड्याळ, मोबाइल आणि टॅबलेटमधील सूक्ष्म स्पेअर्सपार्टची बांधणी यूमी रोबो काही सेकंदांत करतो. त्यामुळे वेळेची बचत होणार असून, उत्पादन वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमधील नव्या मोबाइल उत्पादकांकडून रोबोट्ससाठी मागणी असल्याचे एबीबी इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. १९७४ पासून एबीबी रोबोटिक्स तंत्रज्ञान अस्तित्वात आहे. भारतीय कंपन्यांमध्ये या तंत्रज्ञानाबाबत जागृती वाढू लागली आहे.
‘मेक इन इंडिया’मध्ये नावीन्यतेला आणि तंत्रज्ञान वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या पाच वर्षांत भारतात रोबोटिक्स तंत्रज्ञानाला मोठी मागणी असणार आहे.
सध्या रोबो तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन आघाडीवर आहे. एबीबी इंडियाकडून चीनमधून या रोबोंची आयात केली जाते. रोबो तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. रोबो तंत्रज्ञान खर्चिक असल्याने, भारतीयांच्या गरजांप्रमाणे रोबो विकसित करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Robotics Technology New Holidays