गुंगीचे बिस्किट देऊन लुटले

By Admin | Updated: December 28, 2015 03:54 IST2015-12-28T03:54:54+5:302015-12-28T03:54:54+5:30

स्वारगेट येथून नवी मुंबईकडे निघालेल्या बसमध्ये जेष्ठ नागरिकाला गप्पा मारताना गुंगीचे औषध टाकलेले बिस्किट खायला देऊन लुटल्याचा प्रकार घडला.

The robbery robbed of the bunny | गुंगीचे बिस्किट देऊन लुटले

गुंगीचे बिस्किट देऊन लुटले

पुणे : स्वारगेट येथून नवी मुंबईकडे निघालेल्या बसमध्ये जेष्ठ नागरिकाला गप्पा मारताना गुंगीचे औषध टाकलेले बिस्किट खायला देऊन लुटल्याचा प्रकार घडला. त्यांच्याकडील तब्बल ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.
पुंडलिक हराळे (६४, रा. नवी मुंबई) यांनी या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील जत येथे गेले होते. १५ डिसेंबर रोजी तेथील काम आटोपून ते पुण्यात आले.
दुपारी स्वारगेट बसस्थानकावरून ते नवी मुंबईला जाण्यासाठी बसमध्ये बसले. त्यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाने त्यांना बिस्किट खायला दिले.
बिस्किट खाल्यानंतर काही वेळात हराळे हे बेशुद्ध झाले. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या गळ्यातली सोन्याची साखळी, दोन अंगठ्या असा एकूण ८७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. (प्रतिनिधी)

Web Title: The robbery robbed of the bunny