पोलिसांच्या वेशात दरोडा

By Admin | Updated: May 15, 2016 05:04 IST2016-05-15T05:04:04+5:302016-05-15T05:04:04+5:30

सोन्यावर कर्ज देणाऱ्या मुथुट फायनान्सच्या येथील कार्यालयावर भरदिवसा शस्त्रधारी सहा दरोडेखोरांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. यातील एक जण पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात होता.

Robbery in police custody | पोलिसांच्या वेशात दरोडा

पोलिसांच्या वेशात दरोडा

औरंगाबाद : सोन्यावर कर्ज देणाऱ्या मुथुट फायनान्सच्या येथील कार्यालयावर भरदिवसा शस्त्रधारी सहा दरोडेखोरांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. यातील एक जण पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात होता. कार्यालयातील महिलांनी वेळीच दाखविलेल्या हुशारीमुळे लोकांची गर्दी जमली आणि दरोडेखोरांनी कारमधून पलायन केले.
या प्रकरणी व्यवस्थापक रिना रेजी तोमस यांच्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हॉटेल अमरप्रीत चौकात जालना रोडवर मुथुट फिनकॉर्पचे कार्यालय आहे. सकाळी ९ वाजता व्यवस्थापक रिना रेजी, हिमा बाबू आणि व्ही.जी. गिव्हरगीस यांनी कार्यालय उघडले. या कार्यालयात तीन महिला काम सांभाळतात. ९.४० वाजता सोनेरी रंगाच्या मोटारीतून दोघे कार्यालयाकडे आले. प्रथम पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात असलेला दरोडेखोर खाली उतरला. त्याच्यासोबत इतर चौघे घुसले. हे पोलीस नाहीत, असे लक्षात येताच व्यवस्थापक महिलेने हिमा बाबू हिला मल्याळम भाषेतून अलार्म वाजविण्यास सांगितले. तेवढ्यात व्यवस्थापक महिलेने दोघांना ढकलून बाहेर येऊन आरडाओरड केली. त्यानंतर दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हर दाखवून महिलांना धमकावले आणि आत ओढून नेले. तोपर्यंत बाहेर लोकांची गर्दी जमा झाली होती. हा प्रकार अंगलट येईल, असे वाटल्यामुळे दरोडेखोरांनी कारमधून पोबारा केला.

Web Title: Robbery in police custody