शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शहराच्या २० एमएलडी पाण्यावर दरोडा

By admin | Updated: May 5, 2014 16:23 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे.

दुर्लक्ष : जलवाहिन्यांची गळती होते की पाण्याची चोरी औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. तर दुसरीकडे जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत येणार्‍या दोन जलवाहिन्यांतून सुमारे २० एमएलडी पाण्याची गळती होत आहे. ही गळती आहे की, पाण्याची चोरी हा संशोधनाचा विषय आहे; परंतु औरंगाबादकरांना पाण्यासाठी उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे.मनपाच्या जलउपसा केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह येण्यासाठी ॲप्रोच चॅनलचे काम गतवर्षी दुष्काळात करण्यात आले. त्यामुळे उपसा केंद्रापर्यंत पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. तेथून १४५ एमएलडी पाणी उपसले जात आहे. मात्र, शहरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील २० एमएलडी पाणी मध्येच गळते आहे. असा होतो पाणीपुरवठाशहराला जायकवाडी आणि हर्सूल तलावातून पाणी येते. दररोज २०० द़ ल़ लिटर पाण्याची गरज असून, १२० ते १२५ द़ ल़ लिटर पाणीपुरवठा ५५ जलकुंभापर्यंत होतो. १९७२ साली ७०० मि़ मी़ आणि १९९२ साली टाकलेल्या १४०० मि़ मी़ जलवाहिनीतून शहराला पाणी येते. त्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत़ गळती आणि चोर्‍यांमध्ये २० ते ३० द़ ल़ लिटर पाणी जाते़ शहराची पाण्याची गरजप्रत्येक नागरिकाच्या ५७ लिटर पाण्याची चोरी होत आहे. धरणातून रोज १४५ एमएलडी पाणी उपसले जाते. त्यातून शहराला १२५ एमएलडी पाणी येते. २० एमएलडी पाणी चोरी किंवा गळतीमध्ये जाते. शहराची लोकसंख्या १३ लाख असून, दरडोई १३५ लिटर पाणी देणे मनपाला बंधनकारक आहे. मनपा ७८ लिटर पाणी दरडोई देते आहे. वर्षातून चार महिने पाणीपुरवठा होत असून, दरडोई १४ हजार लिटर पाणीपुरवठा मनपा करते. ३६५ दिवसांसाठी ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल केली जात असून, १२० दिवस वर्षातून महिन्यातून १० दिवस पाणीपुरवठा होतो. १ लाख ५ हजार घरगुती, तर १ हजार ३०० व्यावसायिक नळ कनेक्शन आहेत. चार दिवस लागतीलजायकवाडीला अखंड वीज मिळाली, तर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी चार दिवस लागतील. वेळापत्रक महावितरणच्या शटडाऊनमुळे कोलमडले आहे. पाच मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला तरी शहराचे वेळापत्रक कोलमडते. पाण्याची गळती नेहमीप्रमाणेच आहे. त्याचा वेळापत्रकावर परिणाम झालेला नाही. तसेच पाण्याची चोरीदेखील होत नसल्याचा दावा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.