रस्त्यांची चिरफाड!

By Admin | Updated: August 22, 2014 23:48 IST2014-08-22T23:48:16+5:302014-08-22T23:48:16+5:30

शहरातील गणोशोत्सव मंडळांकडून देखावे, मांडव उभारण्यासाठी चक्क सुस्थितीतील सिमेंटच्या रस्त्यांवर ड्रिल मशीन फिरविले जात आहे.

Roadshops! | रस्त्यांची चिरफाड!

रस्त्यांची चिरफाड!

पुणो : एकीकडे रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे पालिकेला कोटय़वधींचा भरुदड बसतोय अन् दुसरीकडे शहरातील गणोशोत्सव मंडळांकडून देखावे, मांडव  उभारण्यासाठी चक्क सुस्थितीतील सिमेंटच्या रस्त्यांवर ड्रिल मशीन फिरविले जात आहे. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्चून अवघ्या सहा -सात महिन्यांपूर्वी तयार केलेले रस्ते खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भरदिवसा हे काम सुरू असतानाही, महापालिका प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे.
गणोशोत्सवाची चाहूल लागताच शहरातील रस्त्यांवर मांडव टाकण्यासाठी मंडळांकडून घेतल्या  जाणा:या खड्डय़ांचा प्रश्न ऐरणीवर येतो. पालिकेकडून या मंडळांना परवानगी देताना, मांडव रस्त्यावर उभारणार नाही, त्यासाठी रस्ता खोदला जाणार नाही असे हमीपत्र लिहून घेतले जाते. तसेच खड्डे घेतल्यास त्यांच्या दुरुस्ती खर्चही वसूल केला जातो. मात्र, हे खड्डे डांबरी रस्त्यावर असतील तर बुजविता येतात. मात्र, या वर्षी शहरातील काही मंडळांनी मांडवासाठी चक्क नवेकोरे सिमेंटचे रस्तेच मशीन लावून खोदले आहेत. असे खड्डे चक्क चार ते पाच फूट व्यासाचे घेतले असून, त्यासाठी कसेही रस्ते फोडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे आयुष्यच धोक्यात आले असून, दहा ते पंधरा वर्षे खड्डे पडू नयेत, म्हणून केलेले असे रस्ते या खड्डय़ांमुळे अवघे दोन ते तीन वर्षेच टिकतील अशी भीती पालिका प्रशासनच व्यक्त करीत आहे.  (प्रतिनिधी)
 
रस्त्याचे आयुष्य घटतेय
सिमेंटचे रस्ते तयार करताना, ते पुढील 15 वर्षे टिकतील, असे तंत्रज्ञान वापरून केले जातात. त्यासाठी वापरले जाणारे साहित्य काही दिवसांनी एकजीव होऊन रस्त्याला मजबूत बनविते. त्यामुळे हे रस्ते 10 ते 15 वर्षे ऊन, वारा व पावसाचा मारा सहन करून खड्डे- विरहित राहतात. मात्र, आता शहरातील मंडळांनी हे रस्ते यंत्रंच्या द्वारे खोदल्याने त्या भागातून सतत पावासचे अथवा इतर पाणी आत जात राहते आणि रस्त्याला आतील बाजूने भेगा पडण्यास सुरुवात होते. या भेगा अवघ्या काही दिवसांत रस्त्याचा एकजीनसीपणा घालवतात आणि संपूर्ण रस्ताच उखडण्यास सुरुवात होते. तसेच डांबरी  रस्त्याप्रमाणो या रस्त्याची डागडुजी करता येत नाही. त्यामुळे हा रस्ता एकदा खोदल्यानंतर पुन्हा नव्यानेच करावा लागतो.
 
 
कोणत्याही उत्सवात कायदे पुढे करून अडचण करण्याचा महापालिकेचा कोणताही उद्देश नाही. मात्र, अशा प्रकारे सिमेंटचे रस्ते मशीन वापरून फोडणो म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आहे. त्यामुळे अशा प्रकारे खड्डे घेणा:यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- ओमप्रकाश बकोरिया, 
अतिरिक्त आयुक्त
 
हमीपत्र कागदावरच; मंडळांचीही नाही माहिती 
गणोश मंडळांना मांडव उभारणीसाठी महापालिकेकडून परवानग्या देताना, खड्डे न घेता मांडव उभारण्याचे तसेच जर खड्डे घेतले तर, त्याच्या नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे हमीपत्र भरून घेतले जाते. मात्र, हे हमीपत्र केवळ कागदापुरतेच मर्यादित असल्याचे चित्र शहरात आहे. मंडळांनी खड्डे घेतले का, ते नंतर बुजविले का, चुकीच्या पद्धतीने खोदाई झाली का, याची माहिती घेण्याची कसलीही तसदी महापालिकेच्या अतिक्रमण तसेच पथ विभागाकडून घेतली जात नाही. विशेष म्हणजे या वर्षी किती मंडळांना परवानगी दिली याची साधी माहितीही पालिकेकडे नाही.
 
खड्डे न घेताही मांडव शक्य; मात्र प्रबोधनच नाही 
गणोश मंडळांना रस्त्यावर खड्डे न घेता, मांडव उभारणोही शक्य आहे. मात्र, त्यासाठी खर्चाचा विचार न करता, मानसिकता बदलून मंडळांनी हा पर्याय स्वीकारणो गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी मंडळाचे प्रबोधन करण्यास महापालिकेस कधीही वेळ मिळालेला नसल्याचे चित्र आहे. केवळ हमीपत्रत अटी घालून मंडळे प्रतिसाद देत नसतील तर, पालिकेने मंडळांना विनंती करून अथवा त्यांना खड्डय़ांमुळे होणा:या नुकसानीची माहिती देऊन हे प्रकार रोखणो आवश्यक आहे. मात्र, पालिकेकडून ते करण्याची तसदीही घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

 

Web Title: Roadshops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.