शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'झेब्रु' शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 21:01 IST

Zebru Mascot Road safety awareness campaign : रस्ता सुरक्षा जन जागृतीसाठी 'झेब्रु' शुभंकराचा (mascot) अनावरण सोहळा

Zebru Mascot Road safety awareness campaign : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने 'झेब्रु' शुभंकराचा अनावरण परिवहन विभागाचे महत्त्वाचे पाऊल आहे. या शुभंकरामुळे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी झेब्रु शुभंकराचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात आयोजित सोहळ्यात करण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. अपघात रोखण्यासाठी राज्य शासन रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेतून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यात येत आहे. अपघात होणारच नाहीत, यासाठी नागरिकांना ' वाहतूक साक्षर' करण्याचा शासनाचा मानस आहे. या मोहिमेची ही फलश्रुती असून विविध विभागांच्या माध्यमांतून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून रस्ता सुरक्षा मोहिमेत सहभाग घ्यावा. ' रस्ता सुरक्षा जीवन रक्षा' हा मूलमंत्र अंगीकारावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, झेब्रु शुभंकर हा रस्ता सुरक्षेचा संदेश वाहक आहे. पहिला हक्क पादचाऱ्यांचा या जाणिवेतून रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे. ' झेब्रु' ला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात येणार आहे. झेब्रु रस्ता सुरक्षेचा जिवंत आत्मा ठरेल, या पद्धतीने मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येईल. पदपथांवर असलेले अतिक्रमण काढून तेथील रेलिंग न काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून नियमावली बनविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. कार्यक्रमात झेब्रु शुभंकरचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना झेब्रु असलेले सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Zebru' mascot boosts road safety campaign; CM Fadnavis expresses confidence.

Web Summary : CM Fadnavis believes 'Zebru' mascot will enhance road safety awareness. The campaign aims to reduce accidents through public education and adherence to traffic rules. Minister Sarnaik emphasized pedestrian safety and the widespread promotion of 'Zebru' for road safety.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसroad safetyरस्ते सुरक्षा