१९० कोटींची रस्ते दुरुस्ती
By Admin | Updated: August 20, 2014 01:01 IST2014-08-20T01:01:57+5:302014-08-20T01:01:57+5:30
जिल्ह्यात अतिवष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, डीपीसी निधी, विशेष रस्ते दुरुस्ती व पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीसाठी १९० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

१९० कोटींची रस्ते दुरुस्ती
जिल्हा परिषद : मंजूर कामांचे लवकच कार्यादेश
नागपूर : जिल्ह्यात अतिवष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, डीपीसी निधी, विशेष रस्ते दुरुस्ती व पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीसाठी १९० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या कामाचे तातडीने कार्यादेश देण्याचे निर्देश मंगळवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या बैठकीत देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच डीपीसीकडून १६ कोटी मिळाले आहे. बैठकीत ८७ लाखांच्या निविदा स्वीकृत करण्यात आल्या. यातून २० कामे केली जाणार आहे. यात नागपूर तालुक्यातील ७ , उमरेड १, सावनेर ४, हिंगणा ६, कुही १ व मौदा तालुक्यातील ३ कामांचा समावेश असल्याची माहिती उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी दिली.
रस्ते दुरुस्तीसोबतच तीर्थक्षेत्र विकास, आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांचे बांधकाम अशा १९७ कामांना मंजुरी दिली आहे. कामाच्या निविदा काढल्या असून लवकरच कार्यादेश देण्यात येतील.
२०१४ -१५ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणाचे १४१ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. यावर १७०० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत जि.प.रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी ६७ कोटींचा निधी मिळाला आहे. यातून १०२ कि.मी. लांबीचे रस्ते दुरुस्त केले जातील. तसेच पुलाच्या १६ कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीला सदस्य कमलाकर मेंघर, अंबादास उके, प्रेम झाडे, सुरेंद्र शेंडे, शांताराम मडावी, आशा गायकवाड, संध्या गावंडे, नंदा नारनवरे यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)