मालवणीत बसवर दगडफेक

By Admin | Updated: January 16, 2017 06:37 IST2017-01-16T06:37:07+5:302017-01-16T06:37:07+5:30

मालवणीत रविवारी दुपारी एका बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली.

Road blocking in Malwani | मालवणीत बसवर दगडफेक

मालवणीत बसवर दगडफेक


मुंबई : मालवणीत रविवारी दुपारी एका बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. मालवणी गेट क्रमांक ५ जवळ मालवणी पोलीस स्टेशन आहे. या मार्गावरून रूट क्रमांक २७३ ही बस मालाड रेल्वे स्थानकाकडे निघाली होती. त्या वेळी मालवणी पोलीस ठाण्याच्या गेटसमोर उभ्या असलेल्या एका इसमाने या बसच्या दिशेने एक दगड भिरकावला. यात बसची हेडलाइट फुटली. मात्र, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
दगड मारणारा इसम घटनास्थळाहून फरार झाला. ही व्यक्ती कोण होती? त्याने असे का केले? हे मात्र, समजू शकले नाही. या प्रकरणी मालवणी पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Road blocking in Malwani