शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

आधुनिक तंत्रज्ञान रोखणार मुंबईतील रस्ते अपघात

By admin | Updated: June 9, 2017 02:04 IST

रस्ते अपघात रोखण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रस्ते अपघात रोखण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे. याच तंत्रज्ञानाच्या आधारे अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निश्चित करण्यात येतील. त्यानुसार ब्लॅक स्पॉटमध्ये अपघातांची कारणे, अपघातावेळी असलेली परिस्थिती आणि वाहन चालकांचे दुर्लक्ष यावर उपाययोजना आखल्या जातील, असे आंतरराष्ट्रीय रोड सेफ्टी परिषदेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ७ जूनपासून लोअर परेल येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला १७ देशांतील वाहतूक तज्ज्ञांनी हजेरी लावली आहे. रस्त्यांवरील अपघातात होणारे मृत्यू हे २०३०पर्यंत जगभरातील एकूण मृत्यूंच्या कारणांपैकी सातव्या क्रमांकाचे कारण ठरणार आहे. मुंबईत गत दोन वर्षांत ११७३ मुंबईकरांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले. यात ८३ टक्के पुरुष आणि १७ टक्के महिलांचा समावेश आहे. व्यावसायिक वाहने आणि दुचाकीस्वारांकडून (एकटा दुचाकी चालवत असताना) प्रत्येकी २७ टक्के अपघात होत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले.रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्याचबरोबर अपघात प्रवण क्षेत्रांची माहिती, सोशल मीडियातून रोड सेफ्टी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च प्रशिक्षित वाहतूक पोलिसांसह ‘ब्लॅक स्पॉट’ रस्ता सांभाळणारी संबंधित यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. ९ जूनपर्यंत ही परिषद सुरूराहणार आहे. परिषदेत विविध देशांच्या वाहतुकीची सद्य:स्थिती, रस्ते अपघात टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांच्यावर चर्चा करण्यात येत आहे. रस्ते अपघाता पडणाऱ्या बळींची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून जनजागृती संदर्भात विविध उपाययोजनादेखील हाती घेण्यात येणार आहेत.रस्ते अपघातांची कारणेउपायवाहनचालकांचा दुर्लक्षितपणावाहतूक नियमांचे पालन करून काळजीपूर्वक वाहन चालवणेहेल्मेट न घालता दुचाकी चालवणे हेल्मेट वापरल्यामुळे ६९ टक्के रस्ते अपघात कमी होतीलसीट बेल्ट न वापरता वाहन चालवणे, सीट बेल्ट वापरामुळे व मद्यपान न करता वाहन चालवण्याने मद्यपान करून वाहन चालवणे४० ते ६५ रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण रोखता येईलपायाभूत सुविधांचा अभावरस्त्यांवर पादचारी मार्ग, लेनमार्किंग, जड व हलकी वाहने यांची स्वतंत्र मार्गिका केल्याने ४० ते ५० टक्के अपघात रोखता येतीलवाहनांची देखभाल व नियमांचीसीट बेल्ट, एअर बॅग अशा अपघात बचाव करणाऱ्या सुविधा कडक अंमलबजावणी वाहनात असल्यास ६१ टक्के अपघातात मृत्यू टाळता येणे शक्यमुंबईतील १७ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून,त्यातील निवडक अपघातप्रवण क्षेत्र पुढीलप्रमाणे