काचेच्या इमारतींनी वाढविला धोका
By Admin | Updated: July 19, 2014 02:39 IST2014-07-19T02:39:27+5:302014-07-19T02:39:27+5:30
आकर्षक दिसणाऱ्या चकचकीत काचा इमारतींना लावण्याचा प्रकार वाढला आहे़ विशेषत: व्यावसायिक इमारतींचा कल अलीकडे अशा ग्लास फसाड लावण्याकडे आहे़

काचेच्या इमारतींनी वाढविला धोका
मुंबई : आकर्षक दिसणाऱ्या चकचकीत काचा इमारतींना लावण्याचा प्रकार वाढला आहे़ विशेषत: व्यावसायिक इमारतींचा कल अलीकडे अशा ग्लास फसाड (खिडक्यांऐवजी काचा) लावण्याकडे आहे़ परंतु अशा इमारतींमध्ये आगीच्या घटना घडल्यास मदतकार्य धोकादायक ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे़ मात्र अशा सुशोभित काचा लावण्यावर नियंत्रण आणणारे धोरण गेले वर्षभर तयार होत आहे़
लोटस पार्क इमारतालाही अशाच सुशोभित काचा लावल्या होत्या़ त्यामुळे या इमारतीमध्ये आग लागल्यानंतर उष्णतेमुळे या काचा फुटून बाहेर अथवा जिन्यावर त्याचे तुकडे पडू लागले़ त्यामुळे आसपासच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला़ काचेमुळे धूर बाहेर पडू शकत नसल्याने त्यामध्ये अडकलेल्या पीडितांना शोधणेही कठीण होते़ तसेच गुदमरुन अनेकांचा प्राण जावू शकतात़ मात्र अलीकडे बहुतांशी व्यावसायिक इमारतींमध्ये अशा काचा बसविल्या आहेत़ यावर अंकुश आणण्यासाठी पालिकेने गतवर्षी धोरण तयार केले होते़ याचा मसुदा तयार केला होता़ परंतु अद्याप हे धोरण जाहीर केलेले नाही़ याबाबत आयुक्त सीताराम कुंटे यांना विचारले असता ते म्हणाले, तूर्तास मसुदा तयार असून सर्व बाजूने अभ्यास करुन चांगले धोरण आणण्यात येईल. (प्रतिनिधी)