तर १५ वाघांच्या शिकारीचा धोका !
By Admin | Updated: August 27, 2014 04:10 IST2014-08-27T04:10:47+5:302014-08-27T04:10:47+5:30
व्याघ्र प्रकल्पांवर नियंत्रण ठेवणारे हे बोर्ड पंतप्रधानांच्या देखरेखीत कार्य करते.

तर १५ वाघांच्या शिकारीचा धोका !
वैभव बाबरेकर, अमरावती
महाराष्ट्रात सुरू असलेला वनरक्षक, वनपाल व वनमजुरांचा बेमुदत संप त्वरित न मिटल्यास महाराष्ट्रातील सुमारे १५ वाघांची शिकार होण्याची भीती व्यक्त करणारा अहवाल ‘वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल बोर्डा’ने पंतप्रधान कार्यालयाला पाठविला आहे. व्याघ्र प्रकल्पांवर नियंत्रण ठेवणारे हे बोर्ड पंतप्रधानांच्या देखरेखीत कार्य करते.
महाराष्ट्रातील १२ हजार वनरक्षक, २ हजार वनपाल आणि ५ हजार वनकामगारांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत कठीण परिस्थती निर्माण झाली आहे. वनकर्मचाऱ्यांचा संप हा राज्य शासनाच्या अखत्यारीतील विषय आहे. मात्र वनकर्मचारी कामावर हजर नसल्याने वन्यजीवांच्या जीविताला धोका उद्भवू शकतो, हे मात्र खरे. तसा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठविला आहे किंवा नाही, याबाबत तपासावे लागेल, असे नवी मुंबई पश्चिम विभाग वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे विभागीय उपसंचालक एम. मारनको यांनी सांगितले.