दरवाढीमुळे ब्रेड, पाव, खारी, टोस्ट महाग होणार; खाद्यतेल, मैदा, गहू, गॅस दरातील वाढीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 08:17 AM2022-03-10T08:17:47+5:302022-03-10T08:17:59+5:30

कमी दरात मिळणाऱ्या बेकरी पदार्थांमुळे अनेकांना आधार मिळत असतो,मात्र महागाईमुळे आता बेकरी पदार्थांवरही दरवाढीचे संकट दाटले आहे.

Rising prices will make bread, bread, salty, toast more expensive; Rising prices of edible oil, flour, wheat, gas hit | दरवाढीमुळे ब्रेड, पाव, खारी, टोस्ट महाग होणार; खाद्यतेल, मैदा, गहू, गॅस दरातील वाढीचा फटका

दरवाढीमुळे ब्रेड, पाव, खारी, टोस्ट महाग होणार; खाद्यतेल, मैदा, गहू, गॅस दरातील वाढीचा फटका

googlenewsNext

- अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नफेखोरीमुळे देशांतर्गत बाजारात एकीकडे गहू, मैदा, डालड्याचे दर वाढले असून दुसरीकडे गॅस दरवाढीने त्यात तेल ओतले आहे. महागाईची गरम झालेली भट्टी आता बेकरी व्यावसायिकांना चटके देत असून आर्थिक अडचणींमुळे त्यांची चिंता वाढली आहे. यामुळे बेकरी उत्पादनेही लवकरच महाग होण्याची शक्यता आहे.

कमी दरात मिळणाऱ्या बेकरी पदार्थांमुळे अनेकांना आधार मिळत असतो,मात्र महागाईमुळे आता बेकरी पदार्थांवरही दरवाढीचे संकट दाटले आहे. बेकरी उत्पादनात महत्त्वाचे घटक दरवाढीच्या भट्टीत भाजले जात असल्याने त्याची झळ व्यावसायिकांना बसली आहे. 
बेकरीला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या घटकांचे दर वाढल्याने आमच्या अडचणी वाढत आहेत. त्यातच आता डिझेलच्या दरवाढीचे संकेत मिळत असल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. त्यामुळे दरवाढ करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. 
- नाविद मुजावर, खजिनदार, सांगली, मिरज, कुपवाड बेकरी असोसिएशन

गॅसने भडकावली आग
व्यावसायिक गॅसच्या दरात गेल्या महिन्यात तब्बल १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईची आग आणखी भडकली आहे. त्यातच आता डिझेलचे दर वाढले तर, वाहतूक खर्च वाढून त्याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे. 

दरवाढ करण्याचा प्रस्ताव 
सांगली, मिरज, कुपवाड तसेच राज्यभरातील बेकरी असोसिएशन सध्या बेकरी पदार्थांच्या दरवाढीबाबत चर्चा करत आहेत. व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्यामुळे त्यांच्याकडून दरवाढीचा प्रस्ताव तयार केला जात आहे. 
 

Web Title: Rising prices will make bread, bread, salty, toast more expensive; Rising prices of edible oil, flour, wheat, gas hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.