बळीराजा शेतकरी संघटनेचा उदय
By Admin | Updated: November 10, 2014 04:13 IST2014-11-10T04:13:32+5:302014-11-10T04:13:32+5:30
विधानसभा निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी पंढरपुरात एकत्र येत झालेल्या बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली.

बळीराजा शेतकरी संघटनेचा उदय
पंढरपूर : विधानसभा निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी पंढरपुरात एकत्र येत झालेल्या बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली.
बैठकीत ऊस दर आंदोलनाविषयी कोणतीच दिशा ठरविण्यात न आल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली
आहे. विशेष म्हणजे या
संघटनेत कोणीही संस्थापक नसून १२ जणांची सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. समितीचे निर्णयच अंतीम असणार आहेत.
केंद्रीय समिती अध्यक्ष पंजाबराव पाटील (सातारा), राज्य संघटना
प्रमुख सत्तार पटेल (लातूर), बी. जी. पाटील (सांगली), संजय पाटील-घाटणेकर (सोलापूर), नितीन
पाटील (कोल्हापूर), नितीन बागल (पंढरपूर), रामजीवन बोंदर (उस्मानाबाद), प्रदीप पाटील (सांगली), चंद्रकांत यादव (सातारा), राजकुमार सस्तापुरे (लातूर), शंकरराव गोडसे (सातारा),दत्ता गणपाटील (मंगळवेढा) अशी कार्यकारिणी असेल. (प्रतिनिधी)