शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दंगली घडवण्याचे प्रयोग; नवहिंदू ओवेसींच्या खांद्यावर भाजपची बंदूक - संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 07:57 IST

राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर राज्यात तणाव निर्माण करण्याचा आरोप केला. तसेच नवहिंदू ओवेसींच्या माध्यमातून भाजप हे काम करवून घेत असल्याचा आरोप केला. मात्र, राऊत यांनी थेट नाव घेण्याचे टाळले.

मुंबई : उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने एमआयएमच्या ओवेसींचा वापर केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात हिंदू समाजात काही ओवेसी निर्माण करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात फूट पाडण्याचे, दंगली घडविण्याचे आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे.राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर राज्यात तणाव निर्माण करण्याचा आरोप केला. तसेच नवहिंदू ओवेसींच्या माध्यमातून भाजप हे काम करवून घेत असल्याचा आरोप केला. मात्र, राऊत यांनी थेट नाव घेण्याचे टाळले. हे मी कोणाचे व्यक्तिगत नाव घेऊन बोलत नाही. महाराष्ट्रातील ओवेसींच्या माध्यमातून प्रयत्न आहेत; परंतु महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे, जागरूक आहे, संयमी आहे आणि ज्ञानी आहे, एवढेच मी सांगेन. देशभरातील दंगलीचा व्यापक कट आहे आणि जे दिल्लीत घडले ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे; परंतु यशस्वी होणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.योग्य वेळी बोलेन - राज ठाकरेसंजय राऊत व अन्य नेत्यांनी केलेल्या आरोपाबाबत पुण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले, त्यावर मी बोलणार नाही. ते काही बोलले की आम्ही बोलणार, ते पुन्हा बोलणार. मी योग्य वेळी बोलेन.

‘ही राजकीय नाही तर श्रद्धेची यात्रा’राऊत यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही भाष्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना राम मंदिराच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होती. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख तिकडची परिस्थिती पाहून ठरवली जाईल. मात्र, ही काही राजकीय यात्रा नाही, श्रद्धेची यात्रा आहे, असे संजय राऊत म्हणाले.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे