रिंगरोड सिमेंटचे
By Admin | Updated: January 21, 2015 00:24 IST2015-01-21T00:24:10+5:302015-01-21T00:24:10+5:30
नागपूर शहरातून जाणाऱ्या रिंगरोडचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने २९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे.

रिंगरोड सिमेंटचे
गडकरींचे प्रयत्न : २९३ कोटी मंजूर
नागपूर : नागपूर शहरातून जाणाऱ्या रिंगरोडचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने २९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे.
शहरातील रिंगरोडची अवस्था वाईट झाल्याने त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. या मार्गावर अपघातही वाढले होते. त्यामळे रिंगरोडच्या दुरुस्तीची मागणी वेळोवेळी केली जात होती. रिंगरोडचे सिमेंटीकरण केले जाईल,असे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. त्याची पूर्तता यानिमित्ताने झाली आहे.
रिंगरोड सिमेंटीकरणासाठी २९३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून एमआयडीसी ते हिंगणा टी पॉर्इंट, हिंगणा टी पॉर्इंट ते दिघोरी, दिघोरी ते भंडारा रोड, भंडारा रोड ते कामठीरोड, कामठी रोड ते सावनेर रोड, सावनेर रोड ते काटोल रोड, काटोल रोड ते अमरावती रोड असे एकूण १७ किलोमीटर रस्त्यांचे चौपदरीकरण व सहापदरीकरण करण्यात येणार आहे. दोन वर्षाच्या आत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे अनेक दिवसांपासूनची नागपूरकर नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे.
रस्ते होणार सिमेन्टचे
एमआयडीसी टी पॉईन्ट - हिंगणा टी पॉईन्ट, दिघोरी - भंडारा रोड, भंडारा रोड-कामठी रोड,कामठी रोड - सावनेर रोड, सावनेर रोड - काटोल रोड आणि काटोल रोड - अमरावती रोड. या रस्त्या दरम्यान १७ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण व सहा पदरीकरण होणार आहे. यामुळे हिंगणा टी पॉईट ते प्रतापनगर चौक, प्रतापनगर चौक ते छत्रपती चौक, छत्रपती चौक ते मानेवाडा चौक आणि मानेवाडा चौक ते दिघोरी चौक हे रस्ते सिमेंटचे होणार आहे.