योग्यवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री
By Admin | Updated: March 5, 2017 18:35 IST2017-03-05T18:35:02+5:302017-03-05T18:35:02+5:30
शेतक-यांच्या प्रश्नांविषयी गंभीर राज्य सरकार आहे. आमचा कर्जमाफी करण्यास विरोध नाही, पण त्याची अंमलबजावणी योग्यपद्धतीने झाली नाही तर दुरुपयोग होण्याची शक्यता आहे

योग्यवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - शेतक-यांच्या प्रश्नांविषयी गंभीर राज्य सरकार आहे. आमचा कर्जमाफी करण्यास विरोध नाही, पण त्याची अंमलबजावणी योग्यपद्धतीने झाली नाही तर दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. योग्य वेळी कर्जमाफी जाहिर करु असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषद बोलत होते.
निवडणुकांमध्ये आम्हाला जनतेचं समर्थन मिळाल्याने विरोधक नाराज आहेत, त्यांच्याकडे विरोध करण्यासाठी मुद्देच नाहीत असा टोला मुख्यमंत्री यांनी विरोधकांना यावेळी लगावला. स्वतंत्र लढलो असलो तरी मतदान विरोधकांच्या विरोधात झाले असते. पालिका निवडणुकीमध्ये जनतेने शिवसेना-भाजपाला मतं दिली आहेत. काही मुद्द्यांवर शिवसेनेशी मतभेद आहेत, हे आम्ही लपवत नसल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -
- हरभऱ्याचीही हमी भावानं खरेदी करणार' खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला जादा भाव
- राज्यात रेकॉर्डब्रेक तूर खरेदी' तूर खरेदी केल्यावर 3 दिवसांत पैसे
- राज्य सरकारने नाफेडली तुरीचं पेमेंट देण्यासाठी पैसे उपलब्ध करुन दिले आहेत
- शेतकऱ्यांना 894 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली
- राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर