आंबेनळी घाटात दरड कोसळली
By Admin | Updated: August 5, 2016 02:39 IST2016-08-05T02:39:39+5:302016-08-05T02:39:39+5:30
मेटतले ग्रामपंचायत हद्दीत पोलादपूरपासून अंदाजे ३३ किलोमीटर ८00 मीटर अंतरावर दरड कोसळून रस्ता खचल्याने गेले दोन दिवस वाहतूक ठप्प झाली

आंबेनळी घाटात दरड कोसळली
पोलादपूर : पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर मेटतले ग्रामपंचायत हद्दीत पोलादपूरपासून अंदाजे ३३ किलोमीटर ८00 मीटर अंतरावर दरड कोसळून रस्ता खचल्याने गेले दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने दगड, मातीचा आलेला भराव बाजूला करून, एकेरी वाहतूक चालू केली होती, मात्र पुन्हा रस्ता खचल्याने आज दुपारपासून पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली, अशी माहिती पोलादपूर पोलीस सूत्राकडून मिळाली.
दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे.
दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील वाडा परिसरात किल्ले प्रतापगडकडे जाणाऱ्या मार्गावर भली मोठी दरड कोसळली होती, मात्र प्रशासनाने ती दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तसेच रस्त्यावर दरड आल्याने आतील गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे.
दरम्यान, पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील चिरेखिंडजवळील धबधब्याजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या मोरजिवलचा भराव वाहून गेल्याने रस्ता धोकादायक बनला
आहे.