शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

"लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी, पक्ष गेला, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला’’ शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 00:02 IST

Sheetal Mhatre Criticize Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जात शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंकडे आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला, अशी टीका शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेल्या मतभिन्नतेमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या कळीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र आता या भेटीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंकडे आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला, अशी टीका शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर झालेल्या भेटीवरून टीका करताना केलेल्या ट्विटमध्य़े शीतल म्हात्रे म्हणाल्या की, लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी, उद्धव ठाकरेंकडे आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला. कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी‌ गेला. पक्ष गेले, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला, अशी खोचक टीका शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

दरम्यान, शीतल म्हात्रे यांनी आणखी एक ट्विट करून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असल्याचा दावाही या भेटीवरून केला आहे. एक नाव आणि चिन्ह नसलेला पक्ष, नुकताच प्रादेशिक झालेल्या दुसऱ्या पक्षाचे सात्वंन करण्यास गेला आहे. आघाडी मध्ये बिघाडी झाल्याची चर्चा??? All is NOT well? असेही ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्रवीर सावरकरांचा अवमान, गौतम अदानी प्रकरणााची जेपीसी चौकशी, ईव्हीएमचा मुद्दा आणि पंतप्रधान मोदींच्या पदवीचा विषय  या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमधील ठाकरे गट, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मतभेद दिसून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमधील ऐक्याला तडे गेले आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये आज मोठी घडामोड घडलीय. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे हेसुद्धा उपस्थित होते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना