शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

मन : शांतीसाठी हा सायकलवरून निघाला जगाच्या सफरीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 17:23 IST

३५ वर्षीय आयर्लंडचा युवक भ्रमती करीत सोलापूर गाठलं

ठळक मुद्दे- देशभ्रंमतीसाठी निघालेला युवकाने गाठलं सोलापूर- भारताबद्दल भरभरून बोलून त्याने केली भारताची प्रशंसा- 'ग्लॅड टू मीट यू' ..'बाय बाय' म्हणत तो गेला पुढे

रवींद्र देशमुख

सोलापूर: माईक फिन.. जेमतेम ३५ वर्षाचा आयर्लंडचा युवक. होटगी रस्त्यावरून वेगाने सायकलिंग करत निघाला होता. राहण्यासाठी त्याला एक हॉटेल हवं होतं. भारतात कशासाठी आलात?.. सहजच माईकला थांबवून प्रश्न विचारला, तो म्हणतो कसा.. कामाच्या व्यापातून मुक्त होऊन मन : शांतीसाठी इथे आलोय. रिलॅक्स राहण्याची माझी हीच पद्धत आहे !

आसरा चौकातून सात रस्त्याच्या दिशेने सायकलवरून निघालेल्या माईकला शनिवारी दुपारी जेव्हा थांबवलं, तेव्हा त्यांनं हसून प्रतिसाद दिला. कुठून आलात? कशासाठी आलात? काय करता? हे जुजबी प्रश्न विचारल्यानंतर माईक बोलायला लागला.. आयर्लंडला माझा व्यवसाय आहे. जेव्हा मला सुट्टी हवी असते;  मन:शांतीची गरज असते; तेव्हा मी सायकलवरून निघतो. यावेळी जगाची सफर करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत २५ देशांची सफर केलीय. दहा दिवसांपूर्वी विमानाने सायकल घेऊन मुंबईत उतरलो. मुंबई ते विजयवाडा असा सायकल प्रवास करण्याचा माझा मानस आहे..तो सांगू लागला.

भारतात काय पाहायचं ठरवलंय? यावर तो म्हणाला, तसं निश्चित काही ठरवलं नाही. सायकलिंग करणं, ही माझी पॅशन आहे यातूनच मला मन : शांती लाभते. एका देशाचा दौरा झाला की, लगेच मी दुसºया देशात जातो आणि सायकलिंग करता करता तेथील लोकांशी संवाद साधतो. पर्यटन स्थळंही पाहतो.

भारताबद्दल काही ठाऊक आहे का? हे विचारल्यानंतर माईक भरभरून बोलू लागला.. भारत खूप मोठा देश आहे. इथली लोकसंख्याही भरपूर आहे. भारतीय लोक चांगले आहेत, हे मी ऐकलंय आणि आता अनुभवतोय.. माईकने प्रशंसा केली. त्याला किफायतशीर दरात हॉटेल शोधायचे असल्यामुळे 'ग्लॅड टू मीट यू' ..'बाय बाय' म्हणत तो महावीर चौकाच्या दिशेने निघून गेला.- 

टॅग्स :SolapurसोलापूरIndiaभारत