रिक्षावाल्याची कन्या दिल्लीला विमानाने

By Admin | Updated: June 27, 2016 02:40 IST2016-06-27T02:40:58+5:302016-06-27T02:40:58+5:30

आदर्श विद्यालयाची आठवीतील विद्यार्थीनी व रिक्षाचालकाची कन्या मानसी नरेश पाटील ही विमानाने दिल्लीची सफर करून आली.

Rickshawlani's daughter flew to Delhi | रिक्षावाल्याची कन्या दिल्लीला विमानाने

रिक्षावाल्याची कन्या दिल्लीला विमानाने


वसई : लोकमतच्या संस्काराचे मोती या शैक्षणिक उपक्रमात सहभागी झालेली नारिंगी येथील आदर्श विद्यालयाची आठवीतील विद्यार्थीनी व रिक्षाचालकाची कन्या मानसी नरेश पाटील ही विमानाने दिल्लीची सफर करून आली. या सफरीत तिने तिच्या सारख्याच ३५ जिल्ह्यातून विजयी झालेल्या मित्र-मैत्रिणींसमवेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधला. तसेच इंदिरा गांधींच्या निवास स्थानाला भेट दिली.
यामुळे तिच्या शाळेत जल्लोशाचे वातावरण होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभना कलगुटकर यांनी सांगितले, की माझ्या विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी संस्काराचे मोती या उपक्रमात सहभागी होत असतात. मानसीच्या यशामुळे आता अधिक विद्यार्थी यावर्षी सहभागी होतील. तिच्या आईचा तर प्रारंभी या बाबतच्या वृत्तावर विश्वासच बसला नव्हता. परंतु नंतर तिला खूप आनंद झाला. (प्रतिनिधी)
।मानसी सांगते की...
इयत्ता दुसरी पासून मी संस्काराचे मोती या स्पर्धेत सहभागी होते आहे. त्यामुळे माझा खूप विकास झाला यावर्षीही मी सहभागी झाले होते, पण हवाई सफरीचे यश मात्र अनपेक्षित होते. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, मोठे व्हावे

Web Title: Rickshawlani's daughter flew to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.