मारहाण करणारा ‘तो’ रिक्षाचालक अद्याप फरार

By Admin | Updated: February 13, 2017 03:44 IST2017-02-13T03:44:00+5:302017-02-13T03:44:00+5:30

शनिवारी ठाण्यात एसटीचालकाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाची ओळख अद्यापही पटलेली नाही. मात्र, या रिक्षाचालकाच्या रिक्षाचा नंबर पोलिसांच्या हाती

The rickshaw puller is still absconding | मारहाण करणारा ‘तो’ रिक्षाचालक अद्याप फरार

मारहाण करणारा ‘तो’ रिक्षाचालक अद्याप फरार

ठाणे : शनिवारी ठाण्यात एसटीचालकाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाची ओळख अद्यापही पटलेली नाही. मात्र, या रिक्षाचालकाच्या रिक्षाचा नंबर पोलिसांच्या हाती लागला आहे. एसटी चालक एस.ए. खरात शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ठाणे एसटी डेपोकडे घेऊन जात होते. याचदरम्यान, कोर्टनाक्यावरील स्टॉपवर एसटी उभी करताना तेथे उभे असलेले रिक्षाचालक आणि एसटीचालकांत बाचाबाची झाली. याचे पर्यवसान मारामारीत झाल्याने त्या रिक्षाचालकासह इतर चालकांनी एसटीचालकाला मारहाण
केली. त्यानंतर, त्यांनी तेथून पळ काढला.
याप्रकरणी एसटीचे वाहक प्रशांत जाधव यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांनी दिलेल्या तक्रारीत एका रिक्षाचा नंबर नोंदवण्यात आला आहे. मात्र, दुसरा शनिवार आणि रविवार आल्याने त्या रिक्षाचालक व मालकाची ओळख पटवण्यात अडथळा येत आहे. त्याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The rickshaw puller is still absconding