शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रिक्षाचालकाची मुजोरी बेतली रुग्णाच्या जीवावर

By admin | Published: December 22, 2014 8:56 AM

सदर बझार येथे हृदयविकाराच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या तरुणाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षाचालकाने नकार दिल्याप्रकरणी संतप्त जमावाने रिक्षासह स्टॉपच्या फलकाची तोडफोड केली.

 कोल्हापूर : सदर बझार येथे हृदयविकाराच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या तरुणाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षाचालकाने नकार दिल्याप्रकरणी संतप्त जमावाने रिक्षासह स्टॉपच्या फलकाची तोडफोड केली. वेळेत उपचारासाठी दाखल न केल्याने तरुणाचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. अनिल मनोहर कोळी (वय ३५) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले, सदर बझार येथे राहणारा अनिल कोळी हा तरुण हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक बेशुद्ध पडला. अन्य नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या रिक्षा स्टॉपवर उचलून आणले. त्यांनी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षाचालकांना विनंती केली असता ते रिक्षा सुरू करून तिथून पळून गेले. दरम्यान, कोळी याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बराच वेळ निघून गेल्याने रुग्णालयात जाईपर्यंत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्यांनी रिक्षा स्टॉपवर येऊन एका थांबलेल्या रिक्षासह फलकाची तोडफोड करीत गोंधळ घातला. या घटनेची माहिती समजताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला शांत करीत घरी पाठविले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)