रिचा अनिरुद्ध, प्रीती नायर देणार महिला सबलीकरणाचा मंत्र
By Admin | Updated: November 29, 2014 23:10 IST2014-11-29T23:10:00+5:302014-11-29T23:10:00+5:30
‘जिंदगी लाईव्ह’ या टॉक शोच्या निवेदिका रिचा अनिरूद्ध आणि करी नेशन या प्रसिद्ध जाहिरात संस्थेच्या संचालिका प्रीती नायर मार्गदर्शन करणार आहेत.

रिचा अनिरुद्ध, प्रीती नायर देणार महिला सबलीकरणाचा मंत्र
पुणो : लोकमत माध्यम समूहाच्या वतीने आयोजित चौथ्या लोकमत वुमेन समिटमध्ये ‘आयबीएन 7’ वृत्तवाहिनीवरील ‘जिंदगी लाईव्ह’ या टॉक शोच्या निवेदिका रिचा अनिरूद्ध आणि करी नेशन या प्रसिद्ध जाहिरात संस्थेच्या संचालिका प्रीती नायर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी आपआपल्या क्षेत्रत वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही समिट मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी पुण्यात हॉटेल हयात येथे होणार आहे.
4रिचा अनिरुद्ध : रिचा अनिरुद्ध या विविध टॉक शोच्या निवेदिका आहेत. त्यांचा ‘आयबीएन 7’ वृत्तवाहिनीवरील ‘जिंदगी लाईव्ह’ हा शो खूप लोकप्रिय ठरला आहे. माध्यम क्षेत्रत त्यांनी 2क्क्क् मध्ये प्रवेश केला. त्यानंतर मागे वळून न पाहता त्यांनी या क्षेत्रत आपला ठसा उमटविला. सुरूवातीला 2क्क्2 मध्ये झी न्यूज या वाहिनीमध्ये पत्रकार आणि वृत्तनिवेदिका म्हणून काम केले. तीन वर्षानंतर त्यांनी ‘चॅनेल 7’ म्हणजे आताच्या ‘आयबीएन 7’ या वृत्तवाहिनीत काम करण्यास सुरूवात केली. या वाहिनीच्या ‘जिंदगी लाईव्ह’ या टॉक शोचे निवेदन करण्यास त्यांनी 2क्क्7 पासून सुरूवात केली. भारतीय वृत्तवाहिन्यांमध्ये अशाप्रकारचा हा पहिलाच शो होता. पहिल्याच वर्षी या टॉक शोने इंडियन टेलिव्हिजन डॉट कॉमतर्फे दिला जाणारा ‘बेस्ट टॉक शो अॅवॉर्ड’ हा सन्मान पटकावून आपले वेगळेपण सिद्ध केले. त्यानंतर दर वर्षी याच टॉक शोला हा पुरस्कार मिळत आला आहे. विद्यार्थी आत्महत्या, गुजरात दंगल, बाल लैंगिक अत्याचार, महिलांवरील अत्याचार असे विविध सामाजिक विषय अतिशय संवेदनशीलपणो हाताळत रिचा या टॉक शो सादर करतात.
4प्रीती नायर : प्रीती नायर ‘करी नेशन’ या प्रसिद्ध जाहिरात संस्थेच्या संचालिका आहेत. अगदी कमी कालावधीत त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून जाहिरातविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रचा त्यांना 17 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘करी नेशन’ सुरू करण्यापूर्वी त्यांनी ‘बीबीएच इंडिया’ आणि ‘ग्रे वर्ल्डवाईड’ या संस्थांमध्ये नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर या पदावर काम केले आहे. तसेच ‘चैत्र लिओ बर्नेट’ या एजन्सीतही त्यांनी काही काळ काम केले. संपूर्ण करिअरमध्ये त्यांनी 4क् पेक्षा जास्त ब्रँडसाठी काम केले आहे. त्यामध्ये ग्रीनप्लाय, कॅमलिन, आयडिया सेल्युलर, रसना, निर्लेप या बँड्रचा समावेश आहे. नायर यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘इंग्रजी साहित्य’ या विषयात त्यांनी पदवी संपादन केली आहे. त्या वेळी त्यांच्यासमोर करिअरसाठी अध्यापन, पत्रकारिता आणि जाहिरात असे तीन पर्याय होते. मात्र, त्यांनी जाहिरात या क्षेत्रची निवड केली. आज कलात्मकता आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रत उभारी घेतली आहे.