समृद्ध भारताचे स्वप्न मेक इन व्हिलेजमध्ये
By Admin | Updated: October 17, 2016 01:01 IST2016-10-17T01:01:30+5:302016-10-17T01:01:30+5:30
खेडी संपन्न झाल्यास देश समृद्ध होईल. मेक इन व्हिलेज या संकल्पनेवर शेतकरी कंपन्यांनी काम केल्यास गावातील बेरोजगारी कमी होईल.

समृद्ध भारताचे स्वप्न मेक इन व्हिलेजमध्ये
पुणे : खेडी संपन्न झाल्यास देश समृद्ध होईल. मेक इन व्हिलेज या संकल्पनेवर शेतकरी कंपन्यांनी काम केल्यास गावातील बेरोजगारी कमी होईल. सरकार अशा योजनेसाठी हवा तितका निधी द्यायला तयार आहे. मात्र या संकल्पनेसाठी देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग योग्यरीत्या करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.
महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळाच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी शनिवारी पुणे विद्यापीठातील आयुकाच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती. त्याचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कृषी आयुक्त विकास देशमुख, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद आकरे, आत्माचे संचालक सुभाष खेमनर, सहकार पणन विभागाचे सहसचिव का. गो. वळवी, विभागीय सहनिबंधक संतोष पाटील उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, शेतकरी पिकवित असलेला बटाटा, शेंगदाण्याला बाजारभाव अगदी किरकोळ मिळतो. मात्र त्यापासून बनविलेले वेफर्स, खारे शेंगदाणे यांची किंमत मात्र मोठी असते. याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यानुसार आपल्या भागात अशा वस्तूंना कशी मागणी आहे, हे ध्यानात घेऊन उपपदार्थ तयार केले पाहिजेत.
(प्रतिनिधी)