शिंदेशाहीला तरेंच्या बंडखोरीचा सुरूंग

By Admin | Updated: September 27, 2014 22:45 IST2014-09-27T22:45:40+5:302014-09-27T22:45:40+5:30

काँग्रेसमधून अगदी ऐनवेळी आलेल्या रविंद्र फाटक यांना ठाणो शहरमध्ये उमेदवारी दिल्याने शिवसेना उपनेते अनंत तरे यांनीही बंडाचे निशाण फडकविले आहे.

The revolt of rebellion in Shindasaha | शिंदेशाहीला तरेंच्या बंडखोरीचा सुरूंग

शिंदेशाहीला तरेंच्या बंडखोरीचा सुरूंग

>जितेंद्र कालेकर - ठाणो
अखेरच्या क्षणापर्यन्त शिवसेना नेतृत्वाने गाफील ठेवले व   काँग्रेसमधून अगदी ऐनवेळी आलेल्या रविंद्र फाटक यांना ठाणो शहरमध्ये उमेदवारी दिल्याने शिवसेना उपनेते अनंत तरे यांनीही बंडाचे निशाण फडकविले आहे. त्यांनी आता थेट जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनाच आव्हान देत भाजपातून कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्याने ठाण्यातील शिवसेनेच्या आणि  राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
तरेंनी बंडखोरी केली! या वृत्तावरच कोणाचाच विश्वास बसत नव्हता. एकमेकांना फोनाफोनी करुन खात्री केली जात होती. नाही, त्यांनी फक्त अर्ज भरलाय. तो ही कोपरी पाचपाखाडीतून म्हटल्यावर एकनाथ शिंदेंसह सेनेच्या सर्वच नेत्यांची एकच धावपळ उडाली.
ठाणो मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तरे यांनी गेल्यावेळी पासूनच तयारी केली होती. त्यावेळी राजन विचारेंनी तिकीट मिळविण्यात बाजी मारली. यावेळी तरेंसह उपजिल्हाप्रमुख आणि ठामपा सभागृहनेते नरेश म्हस्के, महिला आघाडीप्रमुख अनिता बिर्जे, रामभाऊ फडतरे आणि गोपाळ लांडगे असे अनेकजण इच्छुक होते. त्यातील लांडगेंना कल्याण पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गेल्या विधानसभा आणि लोकसभेपासून उमेदवारीच्या प्रतिक्षेत असलेल्या लांडगेंना उमेदवारी मिळताच ठाण्यासह कल्याणच्याही शिवसैनिकांनी एका निष्ठावंताला न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. तर ठाणो शहरमधून मात्र शेवटपर्यन्त गुलदस्त्यात असलेले  नाव अगदी ऐनवेळी तरीही अपेक्षेप्रमाणोच रविंद्र फाटकांचेच जाहीर झाले. ज्या फाटकांनी शिवसेना सोडल्यानंतर शाखा ताब्यात घेण्याचा प्रय} केला. त्यासाठी काही शिवसैनिक जखमीही झाले. तेच पुन्हा शिवसेनेत दाखल होताच, त्यांना उमेदवारी दिली गेल्याने म्हस्के आणि तरे यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. दुपारी 12 वा. फाटकांनी उमेदवारी अर्ज भरल्याचे समजताच तरेंनी तातडीने सूत्रे हालवून भाजपाचा एबी फॉर्म मिळविला आणि कोपरी पाचपाखाडीतूनच शिंदे यांना आव्हान देत उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान, तोपर्यन्त भाजपाचे संदीप लेले यांनीही कोपरी पाचपाखाडीतून पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे लेले आणि तरे यांच्यापैकी एकाला माघार घ्यावी लागेल. त्यांच्यातील माघारीनंतरच याठिकाणच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सलग तीन वेळा कोपरी पाचपाखाडी भागातून निवडून येणा:या शिंदेंना तरे कशी लढत देतात हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. तिथे दोन्ही वेळा काँग्रेसच्या मनोज शिंदेंचा एकनाथ शिंदेंनी पराभव केला आहे. यावेळीही तिथे आता मनोज शिंदेंऐवजी मोहन तिवारींना तिकीट देण्यात आले आहे.
 
4सतीश प्रधान हे शिवसेनेचे पहिले महापौर म्हणून 1986 ला निवडून आले. त्यांची ही सत्ता वसंत डावखरेंनी 1986-87 ला खेचली. त्यानंतरच्या 1992 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नईम खान महापौर झाले. सलग सात वर्ष काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या सत्तेला 1993 मध्ये अनंत तरे यांनी सुरुंग लावला आणि ठाणो महापालिकेवर भगवा फडकविला, तो आजतागायत आहे. त्यावेळी काँग्रेसच्या भास्कर शेट्टी यांच्यासह पाच नगरसेवक तर अपक्ष सुधाकर चव्हाण, सुजाता घाग, दशरथ पाटील आणि गंगाराम इंदिसे यांच्यासह 13 नगरसेवकांना आपलया तंबूत खेचण्याची किमया तरेंनी केली होती. त्यामुळेच ते 1993, 1994 आणि 1995-96 असे सलग तीन वेळा ते महापौर  म्हणून निवडून आले होते.
 
4ज्या तरेंनी काँग्रेसच्या हातातील सत्ता 1993  मध्ये काँग्रेसच्या हातून शिवसेनेकडे सत्ता खेचून आणली त्यांच्यावरच पक्ष नेतृत्वाने असा अन्याय करणो चुकीचे असल्याचे मत आता शिवसेनेतून व्यक्त होत आहे. 
 
लढलो, नाही लढलो तरी चालेल. निवडून आलो, नाही आलो तरी चालेल. पण पक्षात राहून अन्याय सहन करायचा नाही. म्हणून मी भारतीय जनता पक्षातून अर्ज भरला आहे. संदीप लेले आणि मलाही एबी फॉर्म मिळाला असला तरी माघार कोणी घ्यायची ते नंतर ठरविता येईल.’’
 - अनंत तरे, उमेदवार, 
कोपरी पाचपाखाडी.

Web Title: The revolt of rebellion in Shindasaha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.