शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 4:54 AM

शाश्वत शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने नदी पुनरुज्जीवनाचा सात वर्षीय प्रकल्प हाती घेतला

यवतमाळ : शाश्वत शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने नदी पुनरुज्जीवनाचा सात वर्षीय प्रकल्प हाती घेतला असून त्याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीपासून करण्यात येणार आहे. बुधवारी वाघाडी पुनरुज्जीवनाच्या ९८५ कोटींच्या प्रकल्प आराखड्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या प्रकल्पातून नदी काठावरील साडेपाच हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न पाचपट वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.प्रकल्प आराखडा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून त्याबाबत काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील वाघाडी ही महत्त्वाची नदी यवतमाळ, कळंब, घाटंजी तालुक्यातून वाहते. पैनगंगेची उपनदी असलेली वाघाडी पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळते. उन्हाळ्यातील चार महिने आणि इतरही काही महिन्यांत ही नदी कोरडी पडते. ती बारमाही वाहती राहावी यासाठी इशा फाउंडेशनने काही दिवसांपूर्वी सर्व्हे करून पुनरुज्जीवनाचा आराखडा शासनास सादर केला.ईशा फाउंडेशनचा पुढाकारईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुुदेव यांनी देशभरात ‘रॅली फॉर रिव्हर’ प्रकल्प सुरू केला आहे. त्या अंतर्गतच वाघाडीचे पुनरुज्जीवनकेले जाणार आहे. त्याचा प्रकल्प आराखडा बुधवारी सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या उपस्थितीत राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर करण्यात आला. शासनाने प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविली असून जिल्हा प्रशासनाकडे हा आराखडा पोहोचला आहे.सरकार आणि ‘रॅली फॉर रिव्हर’ने घेतलेल्या या पुढाकाराचे राज्यपालांनी कौतुक केले आणि यवतमाळचा हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी ‘मॉडेल’ ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकरी कल्याण आणि पर्यावरणरक्षण याविषयी पुरोगामी धोरण ठेवून महाराष्ट्र सरकारने यात दाखविलेल्या तत्परतेची सद््गुरूंनी प्रशंसा केली.सद््गुरूंनी भारतातील नद्यांच्या शोचनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी १६ राज्यांमधून ९,३०० किमीची रॅली काढून ‘रॅली फॉररिव्हर’ मोहीम गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू केली. त्यानंतर त्यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेचा आराखडा पंतप्रधानांना सादर केला. त्यानंतरज्या सहा राज्यांनी या मोहिमेअंतर्गत नदी पुनरुज्जीवनाचे सामंजस्यकरार केले, त्यात महाराष्ट्र पहिलेराज्य होते.>विजय दर्डा यांचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांना निमंत्रणलोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी गुरुवारी ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांची भेट घेऊन प्रकल्पाबद्दल चर्चा केली. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी आमच्यातर्फे संपूर्ण सहकार्य मिळेल, असा शब्द त्यांनी दिला. तसेच सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी एकदा यवतमाळला जरूर यावे, त्यांच्या ‘यूथ अ‍ॅण्ड ट्रूथ’ या कार्यक्रमांतर्गत यवतमाळच्या युवकांना मार्गदर्शन करावे, असे निमंत्रणही विजय दर्डा यांनी दिले.>असा राबविला जाणार प्रकल्पवाघाडी नदीच्या काठावर किमान एक किलोमीटर परिसरात झाडांची संख्या वाढविणार.यात प्रामुख्याने फळझाडे लावली जाणारपहिल्या वर्षी प्रकल्पाबाबत नदी काठावरील गावांमध्ये जनजागृती करणारदुसºया वर्षी ३० टक्के, तिसºया वर्षी ६० टक्के आणि चौथ्या वर्षी १०० टक्के वृक्षलागवड पूर्ण करणार.पाच वर्षांत ६० लाख फळझाडे लावली जाणारनदी काठावरील शेतकºयांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त केले जाणारपारंपरिक पिकांपेक्षा फळशेती, सामूहिक शेती करण्यास प्रवृत्त करणारशेतकरी उत्पादन संस्था स्थापन करून फळांची विक्री केली जाणार

टॅग्स :riverनदी