शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 10:27 IST

तिसरी ते दहावी सुधारित अभ्यासक्रम शासनाने जाहीर केला आहे. त्रिभाषा सूत्राबाबत पुढील निर्णय समितीच्या अहवालानंतर घेतला जाण्याची शक्यता आहे

मुंबई - मागील काही महिन्यांपासून राज्यातील शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. राज्य शासनाने पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर काढला आणि त्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर विरोध केला. त्यानंतर दुसरा जीआर शासनाने काढला त्यात हिंदीशिवाय इतर भाषांचा समावेश करण्यात आला. राज्यातील या त्रिभाषा सूत्राला मोठ्या स्तरावर लोकांमधून विरोध होऊ लागला. त्यानंतर शासनाने निर्णय बदलून त्रिभाषा सूत्र रद्द केले. आता राज्य शासनाकडून नवा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्य शासनाने नवीन अभ्यासक्रम जाहीर केला असून त्यात त्रिभाषा सूत्र रद्द करण्यात आले आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. तिसरी ते दहावी सुधारित अभ्यासक्रम शासनाने जाहीर केला आहे. त्रिभाषा सूत्राबाबत पुढील निर्णय समितीच्या अहवालानंतर घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने हा मसुदा तयार केला आहे. त्यात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. तयार करण्यात आलेल्या या मसुद्यातून हिंदी भाषा वगळण्यात आली आहे.

त्रिभाषा सूत्र फॉर्म्युल्याला स्थगिती

राज्यात त्रिभाषा सूत्रातंर्गत हिंदी भाषा शिकवण्याला विरोध झाला. त्यानंतर राज्य शासनाने हा निर्णय रद्द केला. मात्र त्रिभाषा सूत्रावर अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती ३ महिन्यात राज्य शासनाकडे त्यांचा अहवाल सुपूर्द करेल. मात्र तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आम्ही त्रिभाषा सूत्र लागू करणारच असा पवित्रा घेतला. मात्र पहिलीपासून त्रिभाषा लागू होणार की पाचवीपासून याचा निर्णय समितीचा रिपोर्ट आल्यानंतर घेऊ असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणारच असं मुख्यमंत्री म्हणतायेत, आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी. ५ जुलैच्या मोर्चाच्या धक्क्याने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला होता. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून बघाच, आता दुकाने नाही शाळाच बंद करेल. इतर शाळांमध्ये आज मराठी सक्तीची केली पाहिजे असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान दिले होते. 

टॅग्स :Educationशिक्षणhindiहिंदी