दस्तांच्या माध्यमातून वर्षात २० हजार कोटी महसूल !
By Admin | Updated: April 8, 2015 01:36 IST2015-04-08T01:36:49+5:302015-04-08T01:36:49+5:30
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने दस्ताच्या माध्यमातून २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये २० हजार ५४ कोटी रुपयांचा महसूल जमवला .

दस्तांच्या माध्यमातून वर्षात २० हजार कोटी महसूल !
पुणे : राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने दस्ताच्या माध्यमातून २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये २० हजार ५४ कोटी रुपयांचा महसूल जमवला .
नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक श्रीकर परदेशी यांनी ही माहिती दिली. परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नुकतीच नियुक्ती झाली. सोमवारी (१३ एप्रिल) ते कार्यभार स्वीकारतील. नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक म्हणून मंगळवारी त्यांनी शेवटची पत्रकार परिषद घेतली. त्यांनी २०१२ ते २०१५ या तीन आर्थिक वर्षांमधील दस्तसंख्या आणि त्यातून झालेल्या वसुलीची माहिती दिली.
२०१२-२०१३ या आर्थिक वर्षांत विभागाने ९७ हजार ५४५ दस्त नोंदले गेले. त्यातून १७ हजार ५४८ कोटींचा महसूल मिळाला. २०१३-२०१४ मध्ये उद्दिष्टापेक्षा कमी वसुली झाली.२०१४-२०१५मध्ये दस्तांची संख्या घटली. मात्र, मागील वर्षापेक्षा ५७ हजार ९४ दस्त कमी नोंदले गेले, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाल्यामुळे २०१४-१५ मध्ये दस्तनोंदणी कमी झाल्याचे परदेशी यांनी सांगितले.