शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा प्रवास आता ऑक्टोबरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 03:43 IST

मान्सूनबाबत स्कायमेटचा अंदाज : हवामानातील बदलामुळे पावसाचा कालावधी लांबला

मुंबई : मान्सूनचा या वर्षीचा परतीचा प्रवास लांबणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. मान्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानातून सुरू होतो. पश्चिम राजस्थानातून मान्सून पहिल्यांदा परतीच्या प्रवासाला निघतो. मात्र या वेळी हवामानातील बदलामुळे परतीचा प्रवास लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे.प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होतो. केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने देशही विलंबाने व्यापला होता. आता परतीच्या प्रवासालाही मान्सून विलंबाने सुरुवात करणार आहे. गेल्या १० वर्षांत मान्सून सर्वाधिक विलंबाने म्हणजे २९ सप्टेंबर रोजी परतीला निघाला होता तर मान्सूनने परतीचा प्रवास सर्वाधिक लवकर म्हणजे ४ सप्टेंबर रोजी सुरू केला होता. आणि आता म्हणजे २०१९ साली मान्सून आणखी एक नवा रेकॉर्ड नोंदविण्याच्या मार्गावर आहे.हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवसांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, दिल्लीसह अनेक राज्यांत पाऊस पडेल. झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथेही पाऊस पडेल, असा अंदाज आहे.परतीच्या पावसाला का होतोय उशीर?देशाच्या दोन्ही समुद्रकिनारी मान्सूनचा जोर आहे. दक्षिण पूर्वेकडील वारे उत्तर पश्चिम दिशेने वाहत आहेत. यातच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आणि हिक्का नावाचे चक्रिवादळ उठले. हे सुरू असतानाच बंगालच्या खाडीतही हवामानात बदल होत राहिले. परिणामी, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर होत आहे.असा झाला प्रवासदेशभरात जून महिन्यात मान्सूनचे प्रमाण ३३ टक्के कमी होते.जुलै महिन्यात ५ टक्के वाढ झाली. आॅगस्टमध्ये सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत मान्सूनमध्ये १५ टक्के वाढ झाली. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक मान्सूनची नोंद झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह महाराष्ट्रात पूरस्थिती नोंदविण्यात आली.बिहारमध्येही उत्तम पाऊस नोंदविण्यात आला.सप्टेंबर महिन्यात ३२ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला.

 

टॅग्स :Rainपाऊस