निवृत्त पोलिसाने केला मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2016 12:23 IST2016-08-13T12:22:58+5:302016-08-13T12:23:06+5:30

दारू पिऊन आलेल्या मुलासोबत भांडणे झाल्याने चिडलेल्या वडिलांनी 42 वर्षीय मुलाचा खून केल्याची घटना पुण्यात घडली.

The retired police took the child's murder | निवृत्त पोलिसाने केला मुलाचा खून

निवृत्त पोलिसाने केला मुलाचा खून

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १३ - दारू पिऊन आलेल्या मुलासोबत भांडणे झाल्याने चिडलेल्या वडिलांनी 42 वर्षीय मुलाचा डोक्यात घाव घालून खून केला. हि घटना शुक्रवारी रात्री उशिरा मुंढाव्यातील मुंजाबा वस्तीमध्ये घडली.पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले असून ते निवृत्त कारागृह पोलीस आहेत.
भाऊसाहेब साहेबराव लोंढे (वय 42, रा. मुंजाबा वस्ती, मुंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी निवृत्त पोलीस साहेबराव राजाराम लोंढे (वय 65) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भाऊसाहेब यांचा ससून रुग्णालयात पहाटे उपचार घेताना मृत्यू झाला. रात्री उशिरा भाऊसाहेब आणि साहेबराव यांच्यात भांडणे झाली होती. साहेबराव याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भाऊसाहेबांना सासूनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू झाल्यावर पहाटे मुंढवा पोलिसांना माहिती कळवण्यात आली. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. भाऊसाहेब यांचे लग्न झालेले असून त्यांना मुलगी आणि मुलगा आहे.

Web Title: The retired police took the child's murder