‘त्या’ कर्मचा:यांचे निलंबन मागे घ्या
By Admin | Updated: May 31, 2014 23:14 IST2014-05-31T23:14:57+5:302014-05-31T23:14:57+5:30
दिल्ली विद्यापीठाने निलंबित केलेल्या दूरस्थ शिक्षण विभागातील पाच कर्मचा:यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली आहे.

‘त्या’ कर्मचा:यांचे निलंबन मागे घ्या
>नवी दिल्ली : मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती उघड केल्याबद्दल दिल्ली विद्यापीठाने निलंबित केलेल्या दूरस्थ शिक्षण विभागातील पाच कर्मचा:यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली आहे.
इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल वाद निर्माण झाला असून त्यांनी निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रत एकदा बी.ए. तर एकदा बी.कॉम. प्रथम वर्षाला असल्याचे लिहिले होते. यासंदर्भात ट¦ीट करताना त्या म्हणतात, सार्वजनिक जीवनात कुठल्याही प्रकारची चौकशी आणि टीकेचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागते आणि मी सुद्धा यासाठी तयार आहे. दिल्ली विद्यापीठ एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे तेथील कुलगुरूंना मी व्यक्तिगत स्तरावर या कर्मचा:यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती करते आहे.
विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निगने गोपनीय दस्तावेज फोडल्याच्या आरोपावरून आपल्या पाच कर्मचा:यांना निलंबित केल्याचे विद्यापीठातील सूत्रंनी शुक्रवारी सांगितले होते. यामध्ये एक विभाग अधिकारी आणि त्यांना कनिष्ठ चार कर्मचा:यांचा समावेश आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)