बारावी परीक्षेचा निकाल मे अखेरीस

By Admin | Updated: May 18, 2014 01:19 IST2014-05-17T23:52:26+5:302014-05-18T01:19:22+5:30

बारावी परीक्षेचा निकाल मे अखेरीस

The results of the Xth standard examination will be held later | बारावी परीक्षेचा निकाल मे अखेरीस

बारावी परीक्षेचा निकाल मे अखेरीस

बारावी परीक्षेचा निकाल मे अखेरीस
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मे अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर करण्याच्या मंडळाकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
राज्यभरात बारावीची परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र, शिक्षकांना निवडणूकीचे काम दिल्याने शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला होता. यामुळे बारावीचे निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, मे महिन्याअखेरीस बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल असे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले. मुंबई मंडळातून बारावी परीक्षेला ३ लाख २८ हजार ६९८ विद्यार्थी बसले होते.

Web Title: The results of the Xth standard examination will be held later