म्हाडाच्या दोन परीक्षांचा निकाल झाला जाहीर

By Admin | Updated: November 4, 2015 03:22 IST2015-11-04T03:22:34+5:302015-11-04T03:22:34+5:30

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) विविध पदांसाठी तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यापैकी दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल म्हाडाने

The results of two MHADA exams were announced | म्हाडाच्या दोन परीक्षांचा निकाल झाला जाहीर

म्हाडाच्या दोन परीक्षांचा निकाल झाला जाहीर

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) विविध पदांसाठी तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यापैकी दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल म्हाडाने जाहीर केला आहे. रविवारी १ नोव्हेंबर रोजी अखेरच्या टप्प्यात झालेल्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यकारी अभियंता (स्थापत्य), मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, उपअभियंता (स्थापत्य व विद्युत), सहायक विधी सल्लागार, विधी सहायक, लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी, सहायक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व विद्युत) या पदांची परीक्षा २0 आॅक्टोबरला घेण्यात आली, तर लघुटंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदांसाठी २५ आॅक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असल्याचे, म्हाडाचे सचिव डॉ. बी.एन. बास्टेवाड यांनी सांगितले. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, वायरमन या पदांसाठीच्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The results of two MHADA exams were announced