दहावीचा निकाल आज

By Admin | Updated: June 13, 2017 05:01 IST2017-06-13T05:01:46+5:302017-06-13T05:01:46+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल उद्या

Results of tenths today | दहावीचा निकाल आज

दहावीचा निकाल आज

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल उद्या (१३ जून) दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.
गुणपडताळणीसाठी १४ ते २३ जूनपर्यंत अर्ज करता येईल. छायाप्रतींसाठी १४ जून ते ३ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. फेरपरीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये घेतली जाणार आहे, त्यासाठी १९ जूनपासूनअर्ज भरावी लागतील. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणसुधार करण्यासाठी जुलै-आॅगस्ट २०१७ व मार्च २०१८ अशा दोन संधी असतील.
उशिरा का लागला?
राज्य शासनाने अध्यादेश काढून चित्रकला, संगीत आदी कला विषयांच्या गुणांचा समावेश दहावीच्या गुणपत्रिकेत करण्याचा निर्णय घेतला.
राज्य मंडळाला ऐनवेळी कलागुणांची नोंद करावी लागल्याने दहावीचा निकाल लावण्यास
विलंब लागल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

येथे पहा निकाल..
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
www.jagranosh.com
www.maharashtraeducation.com

Web Title: Results of tenths today