शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
By Admin | Updated: June 1, 2015 02:37 IST2015-06-01T02:37:44+5:302015-06-01T02:37:44+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (चौथी) आणि माध्यमिक (सातवी) स्तरावर घेण्यात आलेल्या

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (चौथी) आणि माध्यमिक (सातवी) स्तरावर घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. चौथीच्या एकूण १६ हजार ६८३ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांपैकी १३५१ विद्यार्थी ठाणे जिल्ह्यातील आहेत. तर सातवीच्या शिष्यवृत्तीधारक १६ हजार ४२८ विद्यार्थ्यांपैकी १२३९ विद्यार्थी ठाण्यामधील आहेत. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ९ लाख २५ हजार ६११ विद्यार्थी बसले होते.