२ नोव्हेंबर रोजी लागणार कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिकांचा निकाल
By Admin | Updated: September 28, 2015 16:27 IST2015-09-28T16:26:40+5:302015-09-28T16:27:17+5:30
कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या दोन्ही महापालिकांच्या निवडणुका आयोगाने जाहीर केल्या असून १ नोव्हेंबर रोजी मतदान आणि दोन नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार

२ नोव्हेंबर रोजी लागणार कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिकांचा निकाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या दोन्ही महापालिकांच्या निवडणुका आयोगाने जाहीर केल्या असून १ नोव्हेंबर रोजी मतदान आणि दोन नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून दोन्ही महापालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये १२२ जागांसाठी लढत होणार असून एकूण १३ लाख मतदार आहेत. तर कोल्हापूरमध्ये वाढीव पाच जागा धरून ८२ जागांसाठी मतदान होईल आणि एकूण मतदारसंख्या ४.५ लाख आहे.
सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे ३१ नगरसेवक आहेत, शिवसेना पुरस्कृत ७ नगरसेवक आहेत, तर भाजपाचे ९, काँग्रेसचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे १४, राष्ट्रवादी पुरस्कृत ३, मनसेचे २७ व अपक्ष ११ नगरसेवक आहेत.
तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे ३३, राष्ट्रवादीचे २६, शिवसेनेचे ४, भाजपाचे ३, जनसुराज्य पार्टीचे ९ व शिवसेना भाजपा पुरस्कृत २ नगरसेवक आहेत.