टीवायबीकॉमचा निकाल आता २४ जूनला
By Admin | Updated: June 11, 2016 04:18 IST2016-06-11T04:18:05+5:302016-06-11T04:18:05+5:30
मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाचा बीकॉम आणि बीएस्सीचा निकाल ऐनवेळी म्हणजेच शुक्रवारी पुढे ढकलण्यात आला.

टीवायबीकॉमचा निकाल आता २४ जूनला
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाचा बीकॉम आणि बीएस्सीचा निकाल ऐनवेळी म्हणजेच शुक्रवारी पुढे ढकलण्यात आला. अगदी एक दिवसापूर्वीपर्यंत विद्यापीठाने निकालाबाबत मौन बाळगल्याने हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
निकालाबाबत नव्यान माहिती देताना विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की, टीवायबीएस्सीचा निकाल शनिवारी, ११ जूनला आणि टीवायबीकॉमचा निकाल शुक्रवारी, २४ जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल पुढे ढकलण्यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र टीवायबीकॉमचा निकाल तब्बल दोन आठवड्यांनी जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)