सेट परीक्षेचा निकाल महिनाअखेर लागणार
By Admin | Updated: August 3, 2016 02:03 IST2016-08-03T02:03:49+5:302016-08-03T02:03:49+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मे २०१६मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र-गोवा राज्यातील विद्यार्थ्यांच्या सेट परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिनाअखेरीस जाहीर होण्याची शक्यता

सेट परीक्षेचा निकाल महिनाअखेर लागणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मे २०१६मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र-गोवा राज्यातील विद्यार्थ्यांच्या सेट परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिनाअखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच डिसेंबर महिन्यात पुढील सेट परीक्षा घेतली जाणार आहे, असे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे मे २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेस सुमारे ६५ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. विद्यापीठातर्फे सेट विभागाच्या सर्व विषयांच्या पेपरची उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर विद्यार्थ्यांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. विद्यापीठाकडे काही विषयांच्या सुमारे पन्नास हरकती प्राप्त झाल्या आहेत.
विद्यापीठाच्या समितीकडून या हरकतींचा विचार केला जात आहे. सेटच्या निकालाची तयारी पूर्ण झाली असली, तरी यूजीसी अधिकाऱ्यांकडून निकाल तपासल्यानंतरच प्रसिद्ध केला जाणार आहे.
(प्रतिनिधी)
।विद्यापीठाने सेट परीक्षेच्या निकालाची तयारी पूर्ण केली आहे. तसेच यूजीसीकडे समिती मिळण्याविषयीचा पत्रव्यवहार केला आहे. यूजीसीच्या समितीने निकालाची तपासणी केल्याशिवाय तो प्रसिद्ध करता येत नाही. आॅगस्ट महिना अखेरीपर्यंत यूजीसीची समिती विद्यापीठाच्या सेट विभागाला भेट देऊन निकाल प्रसिद्ध करण्यास मान्यता देईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागेल. मात्र, विद्यापीठातर्फे वर्षातून दोन वेळा सेट परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात घेतली जाईल.
- डॉ. नरेंद्र कडू, कुलसचिव