प्राध्यापकांच्या चालढकलीमुळे रखडतात निकाल
By Admin | Updated: June 15, 2017 00:37 IST2017-06-15T00:37:50+5:302017-06-15T00:37:50+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडले आहे. परीक्षा विभागाला मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना अक्षरश: विनवणी

प्राध्यापकांच्या चालढकलीमुळे रखडतात निकाल
- लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडले आहे. परीक्षा विभागाला मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना अक्षरश: विनवणी करावी लागते. त्यामुळे यंदाही निकाल लांबणार आहेत.
उन्हाळी परीक्षा आटोपून ४५ दिवसांचा कालावधी उलटूनही निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. १४ जूनपर्यंत केवळ ४८ पेपर्सचे निकाल जाहीर झाले असून अद्यापही २२५ ते २५० पेपर्सचे निकाल घोषित व्हायचे आहेत. उत्तरपत्रिकांच्या आॅनलाइन मूल्यांकनासाठी प्राध्यापक हजर राहात नसल्याने परीक्षा विभाग वेळेवर निकाल जाहीर करू शकत नाही, अशी माहिती मिळाली आहे. मूल्यांकनाचे रोख मानधन मिळत नसल्याने काही प्राध्यापकांनी याकडे पाठ फिरवली आहे.
उन्हाळी परीक्षांचे निकाल वेळेवर लागावे, तसेच कामचुकार प्राध्यापकांवर कारवाई करावी, अशी मागणी कुलगुरूंची भेट घेऊन करू.
- पराग गुडधे, जिल्हाप्रमुख, युवासेना