विधी शाखेच्या आॅनलाइन सीईटीचा निकाल जाहीर

By Admin | Updated: June 30, 2016 02:23 IST2016-06-30T02:23:14+5:302016-06-30T02:23:14+5:30

विधीच्या (लॉ) पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा प्रथमच घेण्यात आलेल्या आॅनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला.

The result of online CET result of Rule branch | विधी शाखेच्या आॅनलाइन सीईटीचा निकाल जाहीर

विधी शाखेच्या आॅनलाइन सीईटीचा निकाल जाहीर


मुंबई : राज्यातील तीन व पाच वर्षीय विधीच्या (लॉ) पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा प्रथमच घेण्यात आलेल्या आॅनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. सीईटीला बसलेला प्रत्येक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरला असून मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी दिली.
ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १८ व १९ जून रोजी विधीच्या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी आॅनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्यात तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी २० हजार ११५ आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमासाठी १० हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सीईटीला मिळालेल्या गुणांच्या आधारावर राज्यातील विधी महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत.
राज्यातील महाविद्यालयांत किती जागा आहेत, या संदर्भातील नोंदणी सुरू असल्याचे ओक यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच उपलब्ध जागांची माहिती आणि प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The result of online CET result of Rule branch