पालिका शाळांचा निकाल ५ टक्क्यांनी वाढला

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30

दहावीचा निकाल सोमवारी जाहिर झाला. या निकालात मुंबई महापालिकेच्या शाळांनीदेखील छाप सोडली आहे.

Result of municipal school increased by 5% | पालिका शाळांचा निकाल ५ टक्क्यांनी वाढला

पालिका शाळांचा निकाल ५ टक्क्यांनी वाढला


मुंबई : दहावीचा निकाल सोमवारी जाहिर झाला. या निकालात मुंबई महापालिकेच्या शाळांनीदेखील छाप सोडली आहे. यंदा एकूण निकालात तब्बल ५ टक्क्यांनी वाढ झाली असून, सायली सणस या विद्यार्थीनीने ९४.८० टक्के गूण मिळविले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण १४५ माध्यमिक शाळा असून माध्यमिक शालान्त परीक्षेचा एकूण सरासरी निकाल ७७.५० टक्के इतका लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात ५ टक्क्यांनी वाढ झाली असून तब्बल ५ माध्यमिक शाळांचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे. तर अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील ३२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गूण प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या एकूण शाळांमधून पहिल्या तीन क्रमांकात येणाचा मान मुलींनी पटकावला आहे. ग्लोबमिल पॅसेज इंग्रजी माध्यमिक शाळेच्या सायली सणस हीने ९४.८० टक्के गुण प्राप्त करुन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर कोळीवाडा मनपा उर्दु माध्यमिक शाळेच्या नाजमीन बानो इश्तियाख अहमद अन्सारी या विद्यार्थींनीने ९३.६० टक्के गूण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर एरंगळ मनपा माध्यमिक शाळेच्या गौरी चंद्रकांत लाडने ९३.४० टक्के गूण प्राप्त करुन तृतीय क्रमांक पटकावला यंदा पालिकेच्या पाच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला यात नरेपार्क मनपा माध्यमिक शाळा, परळ, सरस्वती बाग मनपा माध्यमिक मराठी शाळा, जोगेश्वरी (पूर्व), गोखले मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा, दादर (प.),चकाला मनपा उर्दू माध्यमिक शाळा, तरुण भारत सोसायटी, अंधेरी (पूर्व) आणि मरोळ मनपा उर्दू माध्यमिक शाळा या शाळांचा समावेश आहे.
>सुपर २०० चे यश : पालिका प्रशासनाने राबविलेल्या सुपर २०० या अनोख्या उपक्रमामुळे निकालात भरीव वाढ झाली आहे. ९ वी मध्ये ७० टक्क्यांहून अधिक गूण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जातो. त्याचा सकारात्मक परीणाम निकालावर झाला आहे.
- रणजित ढाकणे, उप आयुक्त(शिक्षण)

Web Title: Result of municipal school increased by 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.