कल्याण-डोंबिवलीचा निकाल घसरला
By Admin | Updated: June 9, 2016 04:33 IST2016-06-09T04:33:42+5:302016-06-09T04:33:42+5:30
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मागील वर्षीच्या तुलनेत कल्याण-डोंबिवलीचा निकाल तीन ते चार टक्क्यांनी घसरला आहे.
_ns.jpg)
कल्याण-डोंबिवलीचा निकाल घसरला
डोंबिवली : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मागील वर्षीच्या तुलनेत कल्याण-डोंबिवलीचा निकाल तीन ते चार टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. १५ जूनला दुपारी ३ वाजता गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग येईल. २७ जूनला प्रवेशाची पहिली यादी जाहीर होणार आहे. दुसरी यादी ४ जुलैला, तर तिसरी यादी ११ जुलैला प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी २० तारखेपर्यंत अर्ज भरू शकतात. त्यांच्या अर्जात २१ व २२ जूनला सुधारणा करता येईल. आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया असल्याने अर्ज माहीतगारांकडून भरून घ्यावा, अथवा समजून घ्यावे. त्यानंतरच, तो अर्ज अपलोड करावा, असे आवाहन शाळा, महाविद्यालयांनी केले आहे.
>प्रगती कॉलेज
डोंबिवली
कला शाखा-१२० जागा, कट आॅफ - ४०%
वाणिज्य शाखा-४८० जागा, कट आॅफ- ६५%
विज्ञान शाखा-१२० जागा विनाअनुदानित, कट आॅफ-७५%
बायफोकल इलेक्ट्रॉनिक्स-६० जागा,
संगणक अभ्यासक्रम-६० जागा
>मुथा कॉलेज
कल्याण
कला शाखा-१२०जागा, विनाअनुदानित, कट आॅफ लिस्ट- (अनुत्तीर्ण विद्यार्थी पास झालेले )
वाणिज्य शाखा-३६० जागा, कट आॅफ लिस्ट -४५ टक्के
विज्ञान शाखा-३६० जागा, कट आॅफ लिस्ट - ५५टक्के
आयटीसाठी-७५ जागा; संगणकासाठी-७५ जागा
>सोनावणे कॉलेज
कल्याण
कला शाखा-२४० जागा, कट आॅफ लिस्ट-३५ टक्के
वाणिज्य शाखा-६०० जागा,कट आॅफ लिस्ट-४५ टक्के
विज्ञान शाखा-३६० जागा, कट आॅफ लिस्ट-६० टक्के